Home /News /coronavirus-latest-news /

Maharashtra coronavirus : कोरोनाच्या एका दिवसाच्या आकड्याने उडवली ठाकरे सरकारची झोप; राज्यातील 65% नवे रुग्ण एकट्या मुंबईत

Maharashtra coronavirus : कोरोनाच्या एका दिवसाच्या आकड्याने उडवली ठाकरे सरकारची झोप; राज्यातील 65% नवे रुग्ण एकट्या मुंबईत

राज्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरताना दिसतो आहे.

    मुंबई, 27 मे :  राज्यावरील कोरोनाचं संकट अद्याप टळलेलं नाही याचा पुरावा म्हणजे राज्यातील कोरोनाची धक्कादायक आकडेवारी (Maharashtra corona cases increased). राज्यात मे महिन्यात कोरोना पुन्हा हातपाय पसरताना दिसतो आहे. दिवसेंदिवस नवे रुग्ण वाढत चालले आहेत. दैनंदिन रुग्णांच्या आकडेवारी पाहता आता ठाकरे सरकारचीही झोप उडाली आहे (Maharashtra highest daily corona cases). राज्यातील दिवसभऱातील एकूण नव्या रुग्णांपैकी 65 टक्के रुग्ण एकट्या मुंबईतच सापडल्याने चिंता वाढली आहे (Mumbai highest daily corona cases). राज्यातील कोरोनाच्या नव्या रुग्णांनी 500 चा आकडा पार केला आहे. 27 एप्रिल 2022 च्या राज्याच्या आकडेवारीनुसार आज दिवसभरात 536 नवे रुग्ण सापडले आहेत. 5 मार्चनंतर एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. 5 मार्चला 535 रुग्ण सापडले होते. आता तशीच परिस्थिती पुन्हा आली आहे. राज्यातील एकूण नव्या रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबईतच आहेत. मुंबईत 352 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा राज्याच्या एकूण आकड्याच्या 67% आहे. याआधी 11 फेब्रुवारीला 350 पेक्षा अधिक म्हणजे 367 रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर एकाच दिवसात आज सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. तितकाच काय तो दिलासा आहे. राज्यात आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,47,858 झाली आहे. तर मुंबईतील आकडा 10,63,351  पोहोचला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट म्हणजे कोरोना रुग्ण बरं होण्याचा प्रमाण 98.09 टक्के आहे. तर मृत्यू दर 1.87 आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेचे संकेत? काही दिवसांपूर्वी आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांनी एक संशोधन केले होते. त्यांच्या संशोधनानुसार, 22 जून 2022 रोजी भारतात कोविड-19 साथीच्या रोगाची संभाव्य चौथी लाट सुरू होऊ शकते. ऑगस्टच्या अखेरीस ही लाट उच्चांक गाठू शकते. प्रीप्रिंट रेपॉजिटरी MedRxiv वर शेअर केलेल्या माहितीनुसार, चौथी लाट शोधण्यासाठी सांख्यिकीय मॉडेल्सचा वापर करण्यात आला होता, ज्यामध्ये असं आढळून आलं आहे की संभाव्य चौथी लाट 4 महिने टिकू शकते. चौथ्या लाटेची तीव्रता देशभरातील नवीन कोरोनाव्हायरस आणि लसीकरणाच्या स्थितीवर अवलंबून असेल, असे सांगितलं आहे. हे वाचा - मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण दरम्यान महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता नाकारली आहे.  राज्यात कोरोनाची चौथी लाट येणार नाही, असं स्पष्ट राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. गर्दी करताहेत, राजकीय मेळावे करतात तरीही कोरोना रुग्ण अपेक्षित वाढत नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. चौथ्या लाटेची सुतराम शक्यता वाटत नाही, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. पुन्हा निर्बंध आणि मास्क सक्ती? गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात करताना राज्य सरकारने कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले. मास्क मुक्ती झाल्याने नागरिकांनी सुद्धा मोकळा श्वास घेतला. पण आता पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा एकदा मास्क सक्ती आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही निर्बंध लागू होण्याची शक्यता आहे. हे वाचा - Medicine without Doctors Prescriptions : डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवायच खरेदी करता येणार ही 16 औषधं; पाहा सविस्तर यादी राज्य मंत्रिमंडळाची गुरुवारी बैठक झाली. या बैठकीनंतर मुंबईचे पालकमंत्री असलम शेख यांनीही तसे संकेत दिले. दरम्यान कोरोना रुग्णांमध्ये संथपणे वाढ दिसत असून राज्यातील जनतेने मास्क वापरत रहावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीच्या माध्यमातून जनतेला केले आहे. गेल्या महिन्यात केंद्राचं पाच राज्यांना पत्र भारतातील काही भागांत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने गेल्या महिन्यात पाच राज्यांना पत्र लिहून अलर्ट दिला होता. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, हरियाणा, मिझोराम या राज्यांना पत्र लिहिलं होतं. या पाच राज्यांत पॉझिटिव्हिटी रेट वाढत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि योग्य त्या उपाययोजनेसाठी पावलं उचलण्याच्या सूचना केल्या होत्या.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या