मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

खरं की खोटं! 1 डिसेंबरपासून देशभरात पुन्हा लागू होणार लॉकडाऊन? वाचा काय आहे सत्य

खरं की खोटं! 1 डिसेंबरपासून देशभरात पुन्हा लागू होणार लॉकडाऊन? वाचा काय आहे सत्य

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता E pass किंवा परवानगीची आवश्यकता नाही.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जायला आता E pass किंवा परवानगीची आवश्यकता नाही.

फ्रान्स, स्पेन सारख्या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यातच 1 डिसेंबरपासून केंद्र सरकार पुन्हा लॉकडाऊन जाहीर करणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत.

  • Published by:  Priyanka Gawde

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : देशभरातील कोरोना रुग्णांच्या संख्या पुन्हा वाढली आहे. एकीकडे सणासुदीच्या दिवसात वाढलेली गर्दी तर दुसरीकडे तज्ज्ञांनी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईतही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढली आहे. भारतच नाही तर युरोप आणि अमेरिकेतही कोरोनाची दुसरी लाट आली आहे. त्यामुळे फ्रान्स, स्पेन सारख्या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यातच 1 डिसेंबरपासून केंद्र सरकार पुन्हा लॉकडाऊन जाहीर करणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच 1 डिसेंबरपासून पुन्हा लॉकडाऊन जाहीर करणार असल्याचे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र हा मेसेज फेक असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकमध्ये आढळून आले आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता लॉकडाऊन जाहीर करणार असल्याचे या मेसेमध्ये लिहिले होते, मात्र ही बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे असे मेसेज फॉरवर्ड करताना काळजी घ्या.

वाचा-कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांनी ओलांडला 16 लाखांचा टप्पा, गर्दी वाढल्याने चिंता

वाचा-प्राण्यांनाही कोव्हिडचा धोका? सोशल डिस्टन्सिंग का गरजेचं तज्ज्ञांनी सांगितलं कार

भारत सरकारनं अशी कोणतीही घोषणा केली नसल्याचे पीआयबीने सांगितले आहे. त्यामुळे हा दावा खोटा आहे असे सांगण्यात आले आहे.

कोरोनाची दुसरी लाट येणार हे स्पष्ट

महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्गाचा (Coronavirus) आलेख घसरतो आहे. ही घसरण गेल्या महिनाभरापासून कायम आहे. नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढलेली आहे. पण गाफील राहू नका, कोरोनाची (Covid-19) दुसरी लाट येणार हे स्पष्ट आहे, असे संकेत राज्याचे औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Drug Administration Minister Rajendra Shingane) यांनी सांगितलं आहे.

First published:

Tags: Corona, Corona virus in india