मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /लॉकडाऊनचे साईड इफेक्ट: आता पती-पत्नींच्या नात्यावर होतायेत परिणाम, बेरोजगारीमुळं घरातील वाद वाढले

लॉकडाऊनचे साईड इफेक्ट: आता पती-पत्नींच्या नात्यावर होतायेत परिणाम, बेरोजगारीमुळं घरातील वाद वाढले

शरीरात हार्मोनल बदल, वयानुसार सेक्शुअर हार्मोनमध्ये घट, गर्भधारणा आणि स्तनपान,रजोनिवृत्ती,तणाव,जोडीदाराशी वाद,सेक्शुअल ट्रॉमा अशी कारणं असू शकतात. त्यामुळे तिला यामधून बाहेर येण्यासाठी वेळ द्या.

शरीरात हार्मोनल बदल, वयानुसार सेक्शुअर हार्मोनमध्ये घट, गर्भधारणा आणि स्तनपान,रजोनिवृत्ती,तणाव,जोडीदाराशी वाद,सेक्शुअल ट्रॉमा अशी कारणं असू शकतात. त्यामुळे तिला यामधून बाहेर येण्यासाठी वेळ द्या.

या कोरोनाच्या संकटाचे आणखीही काही साईड इफेक्ट (Corona Side Effect) जाणवू लागले आहेत, आर्थिक अडचणींमुळं पत्नीनं पतीकडं घटस्फोट मागितल्याचे प्रकार आता समोर येत आहेत.

ग्वाल्हेर, 23 मे : सध्याच्या कोरोनाच्या संकटात (Corona in Indai) अनेक व्यवसाय बंद झाले आहेत किंवा त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या कोरोनाच्या संकटाचे आणखीही काही साईड इफेक्ट (Corona Side Effect) जाणवू लागले आहेत, आर्थिक अडचणींमुळं पत्नीनं पतीकडं घटस्फोट मागितल्याचे प्रकार आता समोर येत आहेत.

सध्या न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज देण्यासाठी जाणंही शक्य राहिलेले नाही, कारण कोरोना संकटामुळं लागू करण्यात आलेल्या कर्फ्युदरम्यान कौटुंबिक न्यायालयंही काही काळासाठी बंद आहेत. अशा स्थितीत एका पती-पत्नीनं समाजाच्या पंचायतींसमोर आपलं प्रकरण मांडले पंचायतीनं सुज्ञ विचार करत या दोघांना समजावले आहे आणि आपल्या नात्याला आणखी थोडा वेळ देण्यास सांगितलं आहे. पंचायतीनं समजावल्यानंतर या प्रकरणात समेट घडून आला असून पंचायतीचा सल्ला दाम्पत्यानं मान्य केलाय. पंचायतीनं आता या महिलेकडे घर चालवण्याची आणि नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवली आहे.

हे प्रकरण जरी सोडवलं गेलं असलं, तरी पंचायतीकडं अशाच प्रकारचे आणखी 15 घरगुती तंटे विचाराधीन आहेत. पंचायतीनं हे लॉकडाऊन आणि कोरोना कर्फ्यूचे साईड इफेक्ट असल्याचे म्हटले आहे. हिंदू जनरल पंचायत आणि कायस्थ समाज अशा प्रकारचे पती-पत्नीमधील अशा प्रकारचे तंटे सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. हे सामुदायिक मध्यस्थी केंद्र वाद-विवाद सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

हे वाचा - सावधान! कोणी तुमच्या नावावर बनावट SIM कार्ड तर वापरत नाही ना? पाहा कसं कराल ब्लॉक

प्रत्येक वर्षी येतात 70 ते 80 प्रकरणं

पूज्य सिंध हिंदू पंचायतीचे महासचिव श्रीचंद पंजाबी यांनी सांगितलं की, अध्यक्ष श्रीचंद वलेचा यांच्या नेतृत्वाखाली पंचायतीच्या न्याय समितीचं काम चालतं. या समितीकडं दरवर्षी साधारण 70 ते 80 घरगुती वादविवादाची प्रकरणं येतात. सध्याही समिती 15 प्रकरणांमधील तंटा सोडवण्यासाठी काम करत आहे. आत्तापर्यंत 90 टक्के प्रकरणांमध्ये तंटे सोडवून घरे, नाती वाचवण्यात समितीला यश आलं आहे. अशा प्रकारचे सामुदायिक मध्यस्थी केंद्र कौटुंबिक न्यायालयाला चांगला पर्याय बनू शकतात. यामध्ये नाती वाचवण्यावर भर दिला जातो. सिंधी समाज, कायस्थ समाज, पंजाबी समाज याशिवाय काही समाजांमध्येही अशा प्रकारची नाती वाचवणारी केंद्रे सुरू आहेत. या केंद्रांकडून लॉकडाऊनच्या काळात वाद झालेल्या अनेक जोडप्यांचे समुपदेशन करून त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

First published:

Tags: Lockdown, Relationships