• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • एक छोटीशी चूक पडली महागात! ऐन दिवाळीच्या तोंडावर West Bengal मध्ये पुन्हा Lockdown

एक छोटीशी चूक पडली महागात! ऐन दिवाळीच्या तोंडावर West Bengal मध्ये पुन्हा Lockdown

दुर्गा पूजेनंतर (Durga Puja) पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) कोरोना प्रकरणं इतकी झपाट्याने वाढली आहेत की अखेर राज्य सरकारला पुन्हा लॉकडाऊन (West Bengal lockdown) लागू करावा लागला.

 • Share this:
  कोलकाता, 28 ऑक्टोबर : देशातील कोरोनावर नियंत्रण मिळालेलं असताना आता सणासुदीच्या काळात पुन्हा चिंता वाढली आहे. सण-उत्सवांनंतर कोरोना प्रकरणं वाढताना दिसत आहेत (Corona cases in West Bengal) . नुकतीच नवरात्र संपली. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) दुर्गा पूजा (Durga Puja). झाली. यानंतर इथं कोरोना प्रकरणं इतकी झपाट्याने वाढली आहेत की अखेर राज्य सरकारला पुन्हा लॉकडाऊन (West Bengal lockdown) लागू करावा लागला. नागरिकांच्या एका छोट्या चुकीमुळे ही वेळ ओढावली आहे. राज्यात 24 तासांत 976 कोरोना प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी 272  प्रकरणं फक्त कोलकातातील आहेत. दुर्गा पूजाआधी राज्यात दैनंदिन 500-700 कोरोना रुग्ण आढळत होते. याचा अर्थ दुर्गा पूजेनंतर दैनंदिन रुग्णांचा आकडा जवळपास दुप्पट झाला आहे. त्यामुळे आता सरकारने पुन्हा कडक निर्बंध लागू केले आहेत. राजपूर, सोनारपूर महापालिका क्षेत्रात तीन दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावाधीत सर्व दुकानं ऑफिसेस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक सुरू राहिल पण काही लोकांनाच प्रवास करण्याची मुभा दिली जाईल. हे वाचा - Alert! इथं पुन्हा कोरोना विस्फोट; आठवडाभरात 3 शहरांत लॉकडाऊन, लाखो लोक बंदिस्त राज्यात अशी भयानक परिस्थिती निर्माण होण्याचं कारण म्हणजे नागरिकांचा बेजबाबदारपणा. सरकार कोरोना नियमांचं पालन करण्याच्या वारंवार सूचना देत होते. पोलीसही सार्वजनिक ठिकाणी जाऊन लाऊडस्पीकरवर याबाबत सांगत होते, असं असतानाही लोक त्यांचं उल्लंघन करत होते. मास्कशिवायच रस्त्यावर फिरत होते. सोनारपूर परिसरात पोलिसांनी मास्क न घातलेल्या  74 जणांना ताब्यात घेतलं आहे. डॉ. योगीराज रॉय यांनी सांगितलं की, आता पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. कारण बहुतेक लोकांनी कोरोना लस घेतली आहे आणि लक्षण न दिसणारे रुग्ण संसर्ग जास्त पसरवत आहेत. हे वाचा - बार-पब आणि नाइट क्लबमध्ये मिळणार नाही दारू; पण काय आहे कारण? पश्चिम बंगालमधील कोरोना परिस्थितीमुळे केंद्र सरकारचीही चिंता वाढली आहे. मोदी सरकारने ममता बॅनर्जी सरकारला पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे.  गरज पडल्यास वेगवेगळ्या भागातील मार्केटही बंद करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे.
  Published by:Priya Lad
  First published: