BREAKING महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत Lockdown वाढला, राज्य सरकारचा मोठा निर्णय

BREAKING महाराष्ट्रात 31 जुलैपर्यंत Lockdown वाढला, राज्य सरकारचा मोठा निर्णय

MMRDA परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, दूर जाता येणार नाही.

  • Share this:

मुंबई 29 जून: महाराष्ट्रत लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात कोरोनारुग्णांच्या संख्येत दररोज 5 हजारांची वाढ होत आहे. Unlock झाल्याने गर्दी वाढली असून त्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. (Lockdown in Maharashtra Extended)

MMR परिसरात केवळ अत्यावश्यक सेवेतील लोकांना तसंच कार्यालयात जाणाऱ्यांनाच दूरचा प्रवास करता येणार आहे. शॉपिंगसाठी जवळच्या मार्केटपर्यंत जाता येईल, दूर जाता येणार नाही.

अत्यावश्यक सेवेसाठी लोकांना जाता येईल. मात्र अनावश्यक गर्दी करता येणार नाही. व्यवहार सुरू ठेवण्यासा परवानगी दिली असली तरी सर्व नियमांचं पालन करणं सक्तिचं करण्यात आलं आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता हे सक्तिचं करण्यात आलं आहे.

कोरोना तुमच्या दारातच उभा आहे. गाफील राहू नका असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या संवादात सांगितलं होतं.

राज्याला सलग तिसऱ्या दिवशीही कोरोनाचे हादरे, आज उच्चांकी 5493 रुग्णांची भर

कोरोना रुग्णांची वाढती संख्या काही थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. दर दिवशी कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी समोर येत आहे. देशात कोरोनाची एकूण संख्या 5 लाख 48 हजार 318 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 19,459 नवीन रुग्ण आढळले आणि 380 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाची जवळपास 20 हजार प्रकरणं समोर आली आहेत.

राज्याला सलग तिसऱ्या दिवशीही कोरोनाचे हादरे, आज उच्चांकी 5493 रुग्णांची भर

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे 2 लाख 10 हजार 120 अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनामधून आतापर्यंत 16 हजार 475 रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर 3 लाख 21 हजार 722 रूग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब आहे.

संपादन - अजय कौटिकवार

 

 

First published: June 29, 2020, 3:26 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading