लंडन, 08 ऑक्टोबर : कोरोना (Coronavirus) विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्यावर लस शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरू आहे. स्वीडनमधील शास्रज्ञांना कोव्हिडवरील उपचारांसाठी नवी दिशा मिळाली आहे. कोरोना आणि श्वसनाची क्रिया बंद पडल्यामुळे मरण पावलेल्या रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये एक प्रकारचे जेल तयार झाल्याचं या संशोधकांना आढळलं असून, या जेलमधील एका एजंटच्या आधारे कोरोनावर उपचार करता येतील, असा विश्वास या शास्त्रज्ञांमध्ये निर्माण झाला आहे.
कोरोना संसर्गामुळे गंभीर प्रकृती होऊन मृत्यू झालेल्या रुग्णांचे फुफ्फुस स्कॅन केल्यावर संशोधकांना तिथं पांढऱ्या रंगाचे पॅच आढळले. तसंच मृत कोव्हिड रुग्णांच्या अटोप्सीमध्येही त्यांची फुप्फुसं पारदर्शक लिक्विड जेलीने भरलेली आढळून आली. एखादी व्यक्ती पाण्यात बुडून मेल्यानंतर तिच्या फुफ्फुसांची अवस्था असावी तशी या रुग्णांची फुफ्फुसं होती असंही त्यांना लक्षात आलं.
स्वीडनमधील युमिआ विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केलं आहे. या गटातील संशोधक अर्बन हेल्मन म्हणाले, ‘शरीरात ही जेली तयार करणाऱ्या प्रक्रियेचा वेग कमी करणाऱ्या अनेक थेरेपी आता अस्तित्वात आहेत किंवा एखाद्या एंझाइमचा वापर करून ती जेली कमी करता येते. पण आमच्या संशोधनातून कॉर्टिसोन हे औषध कोव्हिड-19 मध्ये परिणामकारक का ठरत आहे हे पण लक्षात यईल.
(हे वाचा-या शहरात बनतंय भारतातील सर्वात मोठं एअरपोर्ट, होणार 29560 कोटी खर्च)
बायॉलॉजिकल केमिस्ट्री या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार या जेलीमध्ये हायल्युरोनान नावाचा घटक असतो. हा घटक शरीरातील इतर ठिकाणी पण उपयोगी पडतो पण प्रामुख्याने टिश्युंना जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. जखम भरून येणाच्या सुरुवातीच्या प्रक्रियेतही हायल्युरोनान उपयुक्त ठरतं. हा घटक आपल्या अणुंच्या जाळ्याचा वापर करून पाण्याचं रूपांतर जेलीत करू शकतो.
(हे वाचा-रोज केवळ 28 रुपये खर्च करून मिळतील 6 फायदे, उपयोगाची आहे LIC ची ही योजना)
फुफ्फुसांतील अल्वोली या छोट्याशा पिशव्यांमध्ये अशी जेली निर्माण झाली की फुफ्फुसांच्या कामात अडथळा निर्माण होतो आणि त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागतं आणि कधीकधी रुग्णाचा मृत्युही होतो असंही संशोधनातून सिद्ध झालंय. सध्या हायल्युरोनानच्या निर्मितीचं प्रमाण कमी करण्यासाठी हायमेकॉरमोन हे औषध दिलं जातं. गंभीर आजारी कोविड पेशंटना डेक्सामिथॅसोन हे ड्रग असलेलं कॉर्टिसोन दिलं तर त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे असं एखा ब्रिटिश अभ्यासातून लक्षात आलं आहे. कॉर्टिसोनमुळे हायल्युरोनानच्या निर्मितीचं प्रमाण कमी होत असल्यामुळे कोरोनाच्या उपचारांना नवी दिशा मिळणार आहे, असंही हेल्मन यांनी म्हटलं आहे.