LIVE NOW

LIVE: ठाण्यात आज लसीकरण बंद, एकाही केंद्रावर Vaccine उपलब्ध नाही

कोरोनासह राज्य आणि देशभरातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स

Lokmat.news18.com | April 21, 2021, 8:23 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated April 21, 2021
auto-refresh

Highlights

8:23 pm (IST)

नाशिक मनपा रुग्णालयातील धक्कादायक घटना
झाकिर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती
ऑक्सिजनअभावी 25 रुग्णांचा झाला मृत्यू
ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यानं रुग्ण दगावले
नाशिकमधील घटना वेदनादायी -आरोग्यमंत्री
उच्चस्तरीय चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश
दुर्घटनेची सखोल चौकशी होणार - राजेश टोपे
राधाकृष्ण गमे चौकशी समितीचे अध्यक्ष - टोपे
7 सदस्यांची समिती चौकशी करणार - टोपे
चौकशीनंतर दोषींवर कठोर कारवाई - टोपे
'घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची काळजी घेऊ'
मृतांच्या वारसांना एकूण 10 लाखांची मदत - टोपे 

8:21 pm (IST)

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच
राज्यात दिवसभरात 67 हजार 468 नवे रुग्ण
राज्यात दिवसभरात 54 हजार 985 कोरोनामुक्त
राज्यात दिवसभरात 568 कोरोना रुग्णांचा मृत्यू
या वर्षात एका दिवसातील सर्वाधिक मृत्यूची नोंद
रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 81.15, मृत्युदर 1.54%
राज्यात सध्या 6 लाख 95,747 अॅक्टिव्ह रुग्ण  

5:30 pm (IST)

पुणे - माजी खासदार संजय काकडेंना जामीन
शिवाजीनगर सत्र न्यायालयानं दिला जामीन
25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन
गुंड गजा मारणे रॅली प्रकरणात केली होती अटक 

2:27 pm (IST)

'नाशिकमधील ऑक्सिजन टँक गळती दुर्दैवी'
'निष्काळजीपणामुळे अजून किती बळी घेणार?'
विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा सवाल
दरेकरांचा आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क
'जबाबदार असणार्‍यांवर त्वरित कारवाई करा'
भविष्यात काळजी घ्या, दरेकरांची संतप्त प्रतिक्रिया 

2:27 pm (IST)

नाशिकमधून आताची सर्वात मोठी बातमी
मनपा रुग्णालयात ऑक्सिजन टँकला गळती
पालिकेच्या झाकिर हुसेन रुग्णालयातील घटना
शेकडो लीटर अमूल्य ऑक्सिजन वाया
ऑक्सिजन पुरवठा अर्धा तास होता खंडित
'झाकिर हुसेन रुग्णालयातील 11 रुग्ण दगावले'
इतर रुग्णांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू
ऑक्सिजन गळतीमागचं कारण अस्पष्ट

 

12:58 pm (IST)

'सीरम'च्या 'कोव्हिशिल्ड' लसीची किंमत जाहीर
राज्य सरकारला 400 रुपये दरानं एक डोस
खासगी रुग्णालयांना 600 रुपये दरानं विक्री
'सीरम'चे आदर पुनावाला यांची माहिती

12:48 pm (IST)

नाशिक - ऑक्सिजन टॅंकला गळती
पालिकेच्या झाकिर हुसैन रुग्णालयातील घटना
दुरुस्तीसाठी रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल
ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला

12:31 pm (IST)

कुख्यात गुन्हेगार गजा मारणे रॅली प्रकरण
माजी खासदार संजय काकडे पोलिसांच्या ताब्यात
सोशल मीडियावरील क्लिप्सवरून कारवाई

11:26 am (IST)


'अभिमन्यू काळेंच्या बदलीवरून 'मविआ'त मतभेद?' 
काळेंची बदली राष्ट्रवादी नेत्यांच्या दबावामुळे - सूत्र
काळेंच्या बदलीमुळे काँग्रेस नेते नाराज - सूत्र 
'काळेंची तात्काळ बदली करणे योग्य नाही'
काँग्रेस पक्षातील वरिष्ठ मंत्र्यांचा सूर - सूत्र

11:16 am (IST)

शरद पवारांवर पुन्हा छोटी शस्त्रक्रिया
ब्रीच कँडी रुग्णालयात केलं होतं दाखल 

Load More
कोरोनासह राज्य आणि देशभरातील इतर महत्त्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स