मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /दिलासादायक! गेल्या 28 दिवसात 430 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही

दिलासादायक! गेल्या 28 दिवसात 430 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही

Corona Update: देशातील आठ राज्य कोरोनाचे हॉटस्पॉट (Corona Hotspot) म्हणून समोर आले आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्ण या राज्यांतून आहेत. मात्र असं असलं तरी देशात काही जिल्हे असे आहेत की, तिथे गेल्या 28 दिवसात एकही कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 30 मार्च: देशभरात कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी अनेक राज्यांनी कडक निर्बंध लादले आहेत. तर काही राज्य लॉकडाऊनच्या (Lockdown) उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 6 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. देशातील आठ राज्य कोरोनाचे हॉटस्पॉट (Corona Hotspot) म्हणून समोर आले आहेत. देशातील एकूण रुग्णांपैकी 85 टक्के रुग्ण या राज्यांतून आहेत. मात्र असं असलं तरी देशात काही जिल्हे असे आहेत की, तिथे गेल्या 28 दिवसात एकही कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही. एकूण 430 जिल्हे असे आहेत की तिथे कोरोनाला रोखण्यात यश आल्याचं केंद्रीय आरोग्य खात्याकडून (Health Ministry) सांगण्यात आले आहे.

'देशात कोरोनाबाबत स्थिती सध्यातरी नियंत्रणात आहे. नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे. निष्काळजीपणा वाढल्यास रुग्णसंख्या वाढेल. त्यामुळे कोरोनाची नियमावली पाळा' असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन (Health Minister Harsh Wardhan) यांनी केले आहे.

(हे वाचा-वयोवृद्ध कोरोना रुग्णाची आत्महत्या, नागपूरातील घटनेने खळबळ)

देशात गेल्या 24 तासात कोरोनामुळे 271 जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनाचे 56 हजार 211 रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 लाख 40 हजार 720 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 1 कोटी 20 लाख 95 हजार 855 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 13 लाख 93 हजार 21 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे देशात आपार्यंत एकूण 1 लाख 62 हजार 114 जणांचा मृत्यू झाला आहे.

(हे वाचा- सावधान! मुंबईतील ही 5 ठिकाणं आहेत धोक्याची)

दुसरीकडे राज्यात गेल्या 25 दिवसात कोरोना रुग्णांची संख्या 20 टक्क्यांनी वाढली आहे. 4 ते 28 फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चच्या आकडेवारीत सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. 1 ते 25 मार्च दरम्यान राज्यात 4 लाख 39 हजार 366 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 ते 28 फेब्रुवारीदरम्यान 1 लाख 19 हजार 68 रुग्णांची नोंद झाली होती.

First published:

Tags: BJP, Corona hotspot, Corona spread, Covid-19, Health, PM narendra modi, Wellness