मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी आहे भारताची Warm Vaccine? जाणून घ्या वैशिष्ट्यं

कोरोनाच्या सर्व व्हेरिएंटवर प्रभावी आहे भारताची Warm Vaccine? जाणून घ्या वैशिष्ट्यं

File photo

File photo

भारतात बनवली गेलेली वॉर्म व्हॅक्सिन (Warm Corona Vaccine) कोरोनाच्या सर्व व्हॅरिएंटविरोधात (Corona Variants) प्रभावी आहे. या लशीला वॉर्म म्हणजेच गरम यासाठी म्हटलं जातं, कारण ही लस 90 मिनिटांपर्यंत 100 अंश सेल्यियस तापमानातही सुरक्षित राहू शकते

पुढे वाचा ...

नवी दिल्ली 17 जुलै : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि बायोटेक कंपनी मिनव्हॅक्सद्वारे भारतात बनवली गेलेली वॉर्म व्हॅक्सिन (Warm Corona Vaccine) कोरोनाच्या सर्व व्हॅरिएंटविरोधात (Corona Variants) प्रभावी आहे. CSIRO कडून या लसीचं स्वतंत्रपणे केलेल्या विश्लेषणात ही बाब समोर आली आहे, की या लशीला वॉर्म म्हणजेच गरम यासाठी म्हटलं जातं, कारण ही लस 90 मिनिटांपर्यंत 100 अंश सेल्यियस तापमानातही सुरक्षित राहू शकते. सोबतच 37 डिग्री सेल्सियसवर ती स्थिर राहते.

सीएसआयआरओद्वारे (CSIRO) केल्या गेलेल्या विश्लेषणात ही बाब समोर आली आहे, की वॉर्म व्हॅक्सिन बाकी लशींपेक्षा वेगळी आहे कारण याला खूप कमी तापमानाची गरज असते. यानुसार, उंदरांमध्ये या व्हॅक्सिनमुळे कोरोनाच्या विरोधात जबरदस्त इम्यून रिस्पॉन्स आला आहे. ही लस कोरोना व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनच्या एका भागात केलेल्या बदलापासून बनली आहे.

सावधान! आता हलगर्जी नको; पुढचे 100 ते 125 दिवस महत्त्वाचे, तज्ज्ञांनी दिला Alert

प्राण्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासात हे समोर आलं आहे, की भारतीय विज्ञान संस्थान बंगळुरु यांच्याकडून विकसित करण्यात आलेली ही लस कोरोनाच्या सर्व घातक व्हेरिएंट, जसं की अल्फा, बीटा, डेल्टा (Delta), कप्पाविरोधात प्रभावी आहे.

कोरोनाचा कहर; पंतप्रधान मोदींनी 6 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला 'हा' सल्ला

वॉर्म व्हॅक्सिनबाबतची महत्त्वाची माहिती -

रिसर्चनुसार, ही वॉर्म व्हॅक्सिनच फॉर्मूलेशन 37 अंश सेल्सियस तापमानतही एक महिन्यापर्यंत स्थिर राहू शकतं. तर, 100 अंश सेल्सियरवर 90 मिनिटांपर्यंत

खूप कमी तापमानात राहात असल्यानं या लसीला वॉर्म व्हॅक्सिन नाव दिलं गेलं आहे.

आतापर्यंत कोरोनाच्या ज्या लसी विकसित केल्या गेल्या आहेत त्या कुठेही पोहोचवण्यासाठी कोल्ड चेनची व्यवस्था करावी लागते. यामुळे लस पोहोचवण्यासाठी बराच वेळ जातो.

वॉर्म व्हॅक्सिन एका जागेवरुन दुसऱ्या जागी सहजरित्या पोहोचवता येते.

First published:
top videos

    Tags: Corona vaccine, Coronavirus