मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोविशिल्ड लशीबद्दल या महत्वाच्या 9 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

कोविशिल्ड लशीबद्दल या महत्वाच्या 9 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) आणि अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनी यांनी विकसित केलेल्या कोरोनाप्रतिबंधक लशीला ब्रिटनच्या औषध नियामक यंत्रणेने बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे लशीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) आणि अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनी यांनी विकसित केलेल्या कोरोनाप्रतिबंधक लशीला ब्रिटनच्या औषध नियामक यंत्रणेने बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे लशीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) आणि अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनी यांनी विकसित केलेल्या कोरोनाप्रतिबंधक लशीला ब्रिटनच्या औषध नियामक यंत्रणेने बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे लशीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पुणे, 31 डिसेंबर: ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) आणि अ‍ॅस्ट्राझेनेका (AstraZeneca) कंपनीने विकसित केलेल्या कोरोनाप्रतिबंधक लशीला ब्रिटनच्या औषध नियामक यंत्रणेने बुधवारी मंजुरी दिली. त्यामुळे ब्रिटनमध्ये या लसीचे लसीकरण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्या लसीच्या आधारे भारतात पुण्यातली सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII)ही संस्था कोविशिल्ड ही लस तयार करत आहे. ब्रिटनमध्ये परवानगी मिळाल्यामुळे आता भारतातही या लशीच्या वापराला आठवड्याभरात परवानगी मिळेल, असा अंदाज आहे. या लसीबद्दलच्या काही प्रमुख बाबी जाणून घेऊ या. ही लस कोणी विकसित केली आहे? ब्रिटनमधल्या ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या दी जेनर इन्स्टिट्यूट (The Jenner Institute) या संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी अ‍ॅस्ट्राझेनेका या ब्रिटिश-स्वीडिश कंपनीसोबत व्यावसायिक भागीदारी करून ही लस विकसित केली आहे. ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी या लशीची जागतिक पातळीवरील निर्मिती आणि वितरणासाठी करार केल्याचं 30 एप्रिल रोजी जाहीर केलं. लस विकसित करण्यासाठी कोणतं तंत्रज्ञान वापरलं? ऑक्सफर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या या लसीला ChAdOx1 nCoV-19 या नावाने ओळखलं जातं. चिम्पाझींमध्ये आढळणाऱ्या सर्दीच्या सर्वसामान्य विषाणूच्या (Common Cold Virus) (अ‍ॅडेनोव्हायरस) (Adenovirus) दुर्बल केलेल्या रूपापासून (Weakened Version) ही लस तयार करण्यात आली आहे. त्यात जनुकीय बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे माणसांमध्ये त्या विषाणूचं पुनरुत्पादन होऊ शकत नाही, असं ऑक्सफर्ड विद्यापीठानं म्हटलं आहे. या लशीच्या प्रकाराला व्हायरल सेक्टर टाइप असं म्हटलं जातं. कारण, हानिकारक विषाणूचे जनुकीय घटक पेशींमध्ये पाठवून त्याद्वारे प्रतिकार करणारा प्रतिसाद (Immune Response) तयार करण्यासाठी वाहक (Carrier) म्हणून निरुपद्रवी विषाणूचा वापर यात करण्यात आला आहे. माकडांवर याच्या प्री-क्लिनिकल ट्रायल्स करण्यात आल्या. त्या वेळी असं आढळलं, की कोरोनाव्हायरसची (Coronavirus) लागण झाल्यानंतर न्यूमोनिया (Pneumonia) होण्याची स्थिती तयार होण्याचा धोका थोपवून धरण्यात ही लस प्रभावी ठरली होती. या लशीने माकडांचं न्यूमोनियापासून संरक्षण केलं, तसं अन्य काही गंभीर लक्षणंही त्यांच्यात दिसली नाहीत; मात्र लसीमुळे विषाणू मारला गेला नाही. क्लिनिकल ट्रायल्स कधी आणि कुठे झाल्या? या लशीच्या मानवी चाचण्या एप्रिल महिन्यात सुरू झाल्या. चाचण्यांच्या पहिल्या टप्प्यात इंग्लंडमध्ये 1077 स्वयंसेवक सहभागी झाले होते. दुसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांसाठी मे महिन्यात नोंदणी सुरू झाली आणि त्यात 10 हजार 260 जण सहभागी झाले. लशीची परिणामकारकता तपासण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला तिसरा टप्पा सध्या ब्रिटन, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, केनिया आणि अमेरिकेत सुरू आहे. तसंच, भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेमार्फत तिसरा टप्पा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यातल्या या चाचण्यांमध्ये प्रत्येक देशात हजारो नागरिक सहभागी झाले आहेत. क्लिनिकल ट्रायल्सचे निष्कर्ष काय? क्लिनिकल ट्रायल्समधून गोळा केलेल्या माहितीचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं, की या लशीने वेगवेगळ्या दोन डोसनुसार सरासरी 70.4 टक्के परिणामकारकता (Efficacy) दर्शवली. ब्रिटन आणि ब्राझीलमधल्या 11 हजार 636 स्वयंसेवकांवरच्या चाचण्यांमधून निघालेला हा निष्कर्ष होता. एक अर्धा आणि एक पूर्ण असा एकूण दीड डोस देणं पुरेसं मानलं जातं; मात्र चाचण्यांमध्ये आधी एक पूर्ण आणि नंतर काही आठवड्यांनी दुसरा पूर्ण डोस दिलेल्या स्वयंसेवकांमध्ये लशीची परिणाकारकता 62 टक्के दिसली. तसंच, 2741 जणांच्या छोट्या गटाला आधी अर्धा डोस आणि नंतर काही दिवसांनी पूर्ण डोस देण्यात आला होता. त्यांच्यामध्ये लशीची परिणामकारकता 90 टक्के दिसली होती. एकत्रित विश्लेषणानुसार लशीची परिणामकारकता 70 टक्के आहे, असं ऑक्सफर्ड विद्यापीठाने या महिन्याच्या सुरुवातीला म्हटलं होतं. या दोनपैकी नेमक्या कोणत्या डोसेजला परवानगी मिळाली आहे, ते अ‍ॅस्ट्राझेनेकाने सांगितलेलं नाही; मात्र मंजुरी मिळाली आहे, हे सर्वांत महत्त्वाचं आहे, असं संशोधकांचं म्हणणं आहे. लस साठवण्यासाठीची गरज सध्या ज्या लशी तयार करण्यात येत आहेत किंवा मंजुरी मिळण्याच्या बेतात आहेत, त्यापैकी ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीच्या शीतगृह साठवणुकीच्या (Cold Storage) गरजा सर्वसामान्य आहेत. ऑक्सफर्डची ही लस दोन ते आठ अंश सेल्सिअस तापमानाला साठवणं आवश्यक असून, तिची वाहतूकही सोपी आहे. त्यामुळेच या लशीला विकसनशील देशांकडून मोठी मागणी आहे. कारण या देशांमध्ये अत्याधुनिक कोल्ड स्टोअरेजची साखळी नाही. याउलट मॉडर्ना लस साठवण्यासाठी उणे वीस अंश सेल्सिअस तापमानाची गरज आहे. तसंच, फायझर-बायोएनटेकची (Pfizer-BioNTech) लस साठवण्यासाठी तर उणे 70 अंश सेल्सिअस तापमानाची गरज आहे. या आवश्यक तापमानात लशींची साठवणूक होणं अत्यावश्यक आहे. कारण निकषापेक्षा उष्ण वातावरणात साठवणूक केली गेल्यास लशींचा प्रभाव संपुष्टात येऊ शकतो. किती जणांवर चाचणी घेण्यात आली? ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीच्या आधारे भारतात सिरम इन्स्टिट्यूटद्वारे कोविशिल्ड (Covishield) लस तयार करण्यात आली आहे. त्यासाठीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल्ससाठी स्वयंसेवक नोंदणी प्रक्रिया सिरम इन्स्टिट्यूट आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थांनी गेल्या महिन्यात पूर्ण केली आहे. क्लिनिकल ट्रायल्सच्या जागेसाठीचं अर्थसाह्य ICMRकडून केलं जात आहे. क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्रीच्या माहितीनुसार, तिसऱ्या टप्प्यात भारतात 1600 जण सहभागी झाले होते. DCGI आणि ICMR यांच्याकडून साठवणुकीसंदर्भात मिळालेल्या परवानगीनंतर सिरम इन्स्टिट्यूटने स्वतः जोखीम पत्करून सुमारे चार कोटी डोस आधीच तयार करून ठेवले आहेत. ब्रिटनमध्ये परवानगी मिळाली, याचा भारतासाठी अर्थ काय? ब्रिटनच्या औषध नियामक मंडळाने ऑक्सफर्डच्या लशीला परवानगी दिली आहे. त्यामुळे भारतात सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लशीला परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण ही लस त्याच तंत्रज्ञानाने तयार करण्यात आली आहे. 'सिरम'च्या लशीबद्दल भारतीय औषध नियामक मंडळाचं आतापर्यंतचं म्हणणं काय? ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) अर्थात भारतीय औषध नियामक मंडळाच्या विषयतज्ज्ञ समितीने कोविशिल्ड लशीची परिणाकारकता आणि ट्रायल्स यांसंदर्भातील माहिती गोळा करण्यासाठी या महिन्यात एक बैठक घेतली होती. भारतात दुसऱ्या-तिसऱ्या टप्प्यात घेण्यात आलेल्या ट्रायल्सची अंतरिम सुरक्षितता माहिती, तसंच ब्रिटनमध्ये घेण्यात आलेल्या तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांची माहिती कंपनीने मंडळाला सादर केली होती. भारत आणि ब्रिटनमधल्या क्लिनिकल ट्रायल्समधील इम्युनोजेनेसिटीशी (Immunogenecity) संबंधित अधिक माहिती मंडळाने मागवली होती. तसंच, ब्रिटनच्या नियामक मंडळाने लशीच्या केलेल्या विश्लेषणाची माहितीही भारतीय नियामक मंडळाने मागवली होती. लशीचे साइड इफेक्ट्स आणि दुष्परिणाम काय आहेत? लँसेट या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, लशीशी निगडित काही विपरीत परिणामांची नोंद झाली आहे; मात्र त्यापैकी केवळ तीन परिणामांचा लशीशी संबंध असण्याची शक्यता आहे. त्यात ट्रान्सव्हर्स मायलिटिसचा (Transverse Myelitis) समावेश आहे. या केसमध्ये बूस्टर डोस दिल्यानंतर 14 दिवसांनी मज्जारज्जूचा दाह निर्माण झाला. भारतात सिरमच्या लशीच्या चाचण्यांमध्ये सहभागी झालेल्या चेन्नईतल्या एका स्वयंसेवकाने लशीमुळे आपल्याला अ‍ॅक्युट न्यूरो एन्सेफॅलोपॅथी हा विकार झाल्याचा दावा केला. त्यामुळे तो 12 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीत रुग्णालयात दाखल होता. त्याने सिरम, ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्राझेनेकाविरोधात पाच कोटी रुपयांचा नुकसानभरपाईचा दावा ठोकला.  सिरमने मात्र त्याचे दावे खोडून काढले असून, आपण 100 कोटी रुपयांचा नुकसानभरपाईचा दावा ठोकणार असल्याचं सिरमनं म्हटलं आहे.
Published by:Amruta Abhyankar
First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus

पुढील बातम्या