चिंता वाढली! 29 दिवस आयसोलेशनमध्ये राहिलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

चिंता वाढली! 29 दिवस आयसोलेशनमध्ये राहिलेली व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

ज्या लोकांची पहिली कोरोना टेस्ट (corona test) नेगेटिव्ह आली आहे, त्यांची पुन्हा चाचणी करण्याची गरज आहे, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

  • Share this:

तिरुवनंपुरम, 19 एप्रिल : केरळमधील (kerala) कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) एका प्रकरणानंतर आता डॉक्टरांची चिंता अधिक वाढली आहे. एक व्यक्ती 29 दिवस आयसोलेशनमध्ये (isolation) राहिली, तरीही ती कोरोना पॉझिटिव्ह (coronavirus) असल्याचं निदान झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती आपल्या भावासह दुबईहून भारतात परतली होती, त्यांना क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यांचे वडील आजारी होते, त्यांच्यावर उपचार सुरू होते, उपचारादरम्यान त्यांना कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झालं. त्यानंतर त्यांच्या पूर्ण कुटुंबाला कोझिकोड मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची पत्नी, नातू आणि एक मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजलं आणि आता 29 दिवस आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर त्यांचा दुसरा मुलगाही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालं.

हे वाचा : पुणेकरांसाठी पुढील 8 दिवस महत्त्वाचे, अजित पवारांनी दिले कठोर निर्देश

यानंतर डॉक्टरही हैराण झालेत. तज्ज्ञांच्या मते, अशाप्रकारचं हे पहिलं प्रकरण आहे, मात्र आता चिंता वाढली आहे. ज्या लोकांची पहिली टेस्ट नेगेटिव्ह आली आहे, त्यांची पुन्हा चाचणी करण्याची गरज आहे. याशिवाय जर कुणाची चाचणी संशयास्पद वाटली तर त्यांची तपासणी हायर सेंटरमध्ये करण्याची गरज आहे, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

अहमदाबादमध्येही सापडलं होतं असं प्रकरण

विशेष म्हणजे असंच एक प्रकरण अहमदाबादमध्येही पाहायला मिळालं. न्यूयॉर्कहून परतलेल्या एका महिलेला 32 दिवस आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. या महिलेमध्ये कोरोनाव्हायरसची काही लक्षणंही होती. महिलेच्या 9 वेळा चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये काही रिपोर्ट काही रिपोर्ट नेगेटिव्ह तर काही पॉझिटिव्ह होते.

हे वाचा : कोरोनाचा हॉटस्पॉट: रिपोर्ट येण्यापूर्वीच मालेगावात 35 वर्षांचा तरुणाचा मृत्यू

First published: April 19, 2020, 12:43 PM IST

ताज्या बातम्या