कोरोनामुक्त झाल्यानंतरही कनिका कपूर कोरोनाग्रस्तांना देऊ शकत नाही रक्त कारण...

कोरोनामुक्त झाल्यानंतरही कनिका कपूर कोरोनाग्रस्तांना देऊ शकत नाही रक्त कारण...

कनिका कपूरच्या (Kanika Kapoor) रक्तातील प्लाझ्मा (Plasma) कोरोनाव्हायरस (Coronavirus) रुग्णांच्या कामी नाही येऊ शकत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

  • Share this:

लखनऊ, 28 एप्रिल : कोरोनाव्हायरसशी (Coronavirus) यशस्वी लढा दिल्यानंतर बॉलीवूड सिंगर कनिका कपूरने (Bollywood Singer Kanika Kapoor) कोरोनाग्रस्तांसाठी रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र इच्छा असूनही कनिका कपूर कोरोना रुग्णांना आपलं रक्त देऊ शकत नाही, कारण तिच्या रक्तातील प्लाझ्मा (Plasma) कोरोना रुग्णांच्या कामी येणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कनिका कपूरला कोरोनाव्हायरसचं निदान झाल्यानंतर पीजीआईमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. तिने कोरोनावर मात केली आणि त्यानंतर आपल्या रक्ताने इतर कोरोनाग्रस्तांना वाचवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर केजीएमयूच्या ट्रान्सफ्युजन मेडिसीन विभागाने प्लाझ्मा तपासणीसाठी सोमवारी कनिका कपूरच्या रक्ताचे नमुने घेतले होते. मंगळवारी सकाळी त्याचा अहवाल आला.

केजीएमयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कनिका कपूरच्या शरीरातील अँटिबॉडीज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचारासाठी फायदेशीर नाहीत. कनिका कपूर हायग्रेड कोरोना पॉझिटिव्ह नव्हती त्यामुळे तिच्या प्लाझ्मातील अँटिबॉडीजही कमजोर आहेत.

हे वाचा - पालकांनो लक्ष द्या! लहान मुलांमध्ये दिसतायेत Coronavirus ची वेगळी लक्षणं

कोरोना नेगेटिव्ह झाल्यानंतर कनिका लखनऊमध्ये आपल्या कुटुंबासह राहत आहे.

लखनऊच्या केजीएमयूमध्ये कोरोनाविरोधात प्लाझ्मा थेरेपीवर काम सुरू करण्यात आलं आहे. वेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या एका रुग्णाला प्लाझ्मा देण्यात आलेत, ज्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली आहे.

काय आहे प्लाझ्मा थेरेपी?

डॉक्टरांनी सांगितलं की, जो रुग्ण 3 आठवड्यांपूर्वी बरा झाला आहे, त्यांच्या रक्तातील प्लाझ्मा घेतले जातात. एका व्यक्तीच्या रक्तातून जास्तीत जास्त 800 मिलीलीटर प्लाझ्मा घेतलं जाऊ शकतो, तर कोरोना रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज टाकण्यासाठी 200 मिलीमीटर प्लाझ्मा चढवलं जातं.

हे वाचा -कोरोना वॉरिअर बनून रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरनं केली आत्महत्या

दिल्लीतील AIIMS चे रणदीप गुलेरिया म्हणाले, "कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी रुग्णाच्या शरीरात अँटिबॉडीज तयार होतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही त्याच्या रक्तात या अँटिबॉडीज कायम असतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील प्लाझ्मा कोरोना रुग्णाच्या शरीरात सोडले जातात. जेणेकरून त्या प्लाझ्मातील अँटिबॉडीज रुग्णाच्या शरीरातील व्हायरसशी लढतील."

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: April 28, 2020, 1:33 PM IST

ताज्या बातम्या