मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

अजबच आहे! 10 महिन्यात दोन वेळा Corona Positve; तरीही विचारतोय काय आहे कोरोना?

अजबच आहे! 10 महिन्यात दोन वेळा Corona Positve; तरीही विचारतोय काय आहे कोरोना?

अख्ख्या जगात दहशत असलेल्या कोरोना महासाथीबद्दल या तरुणाला मात्र काहीच माहिती नाही. काय आहे हा प्रकार?

अख्ख्या जगात दहशत असलेल्या कोरोना महासाथीबद्दल या तरुणाला मात्र काहीच माहिती नाही. काय आहे हा प्रकार?

अख्ख्या जगात दहशत असलेल्या कोरोना महासाथीबद्दल या तरुणाला मात्र काहीच माहिती नाही. काय आहे हा प्रकार?

  • Published by:  Meenal Gangurde

इंग्लंडमधून (England) एक हैरान करणारा प्रकार समोर आला आहे. येथे एक तरुणाला दोन वेळा कोरोनाची लागण झाली. तरीही त्याला कोरोना काय आहे याबद्दल माहित नाही. हा प्रकार समोर आल्यानंतर सर्वजण हैराण झाले आहे. त्याचं झालं असं की हा तरुण गेल्या वर्षभरापासून कोमात होता. जेव्हा तो कोमामधून बाहेर आला तेव्हा त्याला कोरोना महासाथीबाबत माहिती नव्हती. विशेष म्हणजे कोमामध्ये असताना त्याला दोन वेळेस कोरोनाची लागण झाली होती. 19 वर्षीय जोसेफ फ्लेविल 1 मार्च 2020 रोजी स्टॅफोर्डशायरमध्ये (Staffordshire) आपल्या घराच्या दिशेने जात असताना अपघात झाला. कारने त्याला धडक दिल्याने तो यात खूप जखमी झाला होता. जोसेफचा (Joseph Flavill) हा अपघात ब्रिटेनमध्ये पहिला लॉकडाऊन लागू होण्याच्या 3 आठवड्यांपूर्वी झाला होता. तेव्हापासून तो 11 महिने कोमात होता. चांगली बाब म्हणजे आता तो शुद्धीवर आला आहे. आणि डोळे मिचकावून इशारा देखील देतो. याशिवाय आपल्या नातेवाईकांना पाहून तो आनंदी होतो.

हे ही वाचा-कोमामध्ये असताना दिला बाळाला जन्म, 3 महिन्यांनी चिमुरडीला घेतलं कुशीत

अपघातानंतर त्याला लेस्टर जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, येथे तो 6 महिने कोमात होता. यानंतर त्याला एडर्ली ग्रीन न्युरोलॉजिकल सेंटरमध्येही दाखल करण्यात आलं, येथे तो 5 महिने होता. यादरम्यान त्याला दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. पहिल्यांदा तो कोमामध्ये असताना त्याला कोरोनाची लागण झाली. तर दुसऱ्यांदा तो कोमामधून बाहेर आल्यानंतर संक्रमित झाला. दोन्ही वेळेस तो कोरोनातून बरा झाला. जोसेफ याची प्रकृती सुधारत आहे. आता तो शेक हँडही करू लागला आहे.

coronavirus

कोरोना महासाथीमुळे जोसेफचे कुटुंबीय त्याला भेटू शकत नव्हते. मात्र व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून ते जोसेफशी संवाद साधतात. जोसेफच्या काकीने सांगितलं की, कुटुंबीयांना पाहून तो खूप आनंदी होतो. अपघातापूर्वी तो खेळात खूप सक्रिय होता. जोसेफच्या कुटुंबाने त्याच्यासाठी एक फंड रेसिंग पेज सुरू केला असून त्याच्या माध्यमातून जोसेफच्या उपचारासाठी पैसे जमा केले जात आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus