मुंबई, 29 ऑक्टोबर : कोरोनामुळे आपलं रुटीन संपूर्ण बदललं. सुरुवातीच्या लॉकडाऊनच्या काळात तर घरात राहून आणि बसून बसून अनेकांना कोरोनाचा संसर्ग नाही पण इतर आजारांचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे स्वयंपाकघरात काम करणाऱ्या गृहिणींची मात्र खूप धावपळ झाली. जास्त वेळ गॅससमोर उभं राहून काम करणं आणि सतत कामाला जुंपलेलं राहाणं यामुळे त्यांना मध्ये वेळ मिळणाराही कमी झाला. कोरोना आणि लॉकडाऊनदरम्यान झालेल्या एका अभ्यासातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कोरोनाचा संसर्ग नाही मात्र इतर आजारांना मात्र आमंत्रण देण्यात आलं आहे. जागतिक स्तरावर नुकत्याच झालेल्या अमेरिकन अभ्यासानुसार असं दिसून आलं आहे की निवारा-अंतर्गत-मार्गदर्शक तत्त्वे आणि कोरोनाच्या या महासंकटात आपल्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे.
कोव्हिड – 19 च्या दुसर्या लाटेच्या धोक्यामुळे जगभरात महामारीच्या आजाराशी संबंधित इतर अडचणी खूप मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. वेल्स आणि आयरिश नागरिकांना पुन्हा लॉकडाउन करावं लागलं आहे आणि फ्रान्सनं देखील लॉगडाऊनच्या नव्या गाइडलाइन जाहीर केल्या आहेत. यामध्ये अनेक व्यावसाय बंद राहणार आहेत.
मार्च आणि एप्रिलमध्ये, काही लोकांनी व्यायामासाठी, जास्त तास झोपण्यासाठी आणि निरोगी जेवण बनवण्यासाठी घरातच राहण्याच्या निर्बंधांचा आनंद घेतला, पण असं दिसतं की हे सगळीकडे असंच होतं असं नाही. एप्रिल 2020 मध्ये बॅटन रौगमध्ये पेनिंग्टन बायोमेडिकल रिसर्च सेंटरने केलेल्या अभ्यासात जगभरातील 7753 लोकांचं सर्वेक्षण करण्यात आलं त्यात असं दिसून आले की लॉकडाऊन प्रत्येकासाठी आरोग्यदायी ठरला असं काही नाही.'ओबेसिटी' मध्ये प्रकाशित केलेल्या निष्कर्षांवरून असं दिसून आलं आहे की बाहेर जेवणाच्या जागी घरी स्वयंपाक करून खाल्ल्यामुळे सामाजिक अंतर पाळून काहींना आरोग्यासाठी खाण्याच्या उत्तम सवयी लागल्या. त्याचवेळी, टीव्ही पाहताना खाणंदेखील वारंवार होत असे.
हे वाचा-IPL 2020 : विराट मैदानात, अनुष्का स्टेडियममध्ये, दोघांचा खाणाखुणांचा खेळ
लॉकडाउन होण्यापूर्वी, अभ्यासात सहभागी झालेल्यांपैकी 32 टक्के लोकांचं लॉकडाउनपूर्वीचं वजन "सामान्य" होतं, 32 टक्के लोकांचं "जास्त वजन" होतं आणि 34 टक्के लठ्ठपणाने ग्रस्त होते. एकूण नमुन्यांच्या 27.5 टक्के लोकांमध्ये वजन वाढ आणि 33.4 टक्के लोकांमध्ये लठ्ठपणा आहे. संशोधकांनी या वजन वाढण्याचं कारण अधिककाळ घरात बसून राहणं आणि शारीरिक हालचालींना कमी वेळ देणं हे असल्याचं म्हटलं आहे. अभ्यासामध्ये असंही दिसून आलं आहे की चिंतेच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे, ज्याचा झोपेच्या गुणवत्तेवर हानिकारक परिणाम झाला.
"कोव्हिड - 19 महामारीने कोरोनाच्या विषाणूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांहून वेगळे असे अनेक दुष्परिणाम आरोग्यावर झाले आहेत. सरकारच्या आदेशांचा आणि विषाणू संसर्गाच्या भीतीचा दैनंदिन जीवनशैली आणि वर्तनावर प्रचंड परिणाम झाला असून, मानसिक आरोग्यावरही लक्षणीय परिणाम झाला आहे. या हानिकारक परिणामांमुळे लोकांचं वजन वाढलं आहे. '' असं या संशोधकांचं मत आहे.