मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोना संसर्ग रोखण्यासाठी Social Distancing पुरेसं नाही! संशोधनात म्हणतात..

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी Social Distancing पुरेसं नाही! संशोधनात म्हणतात..

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Coronavirus Infection Latest Research: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) पाळण्यास सांगितल जात आहे. मात्र, ब्रिटनमधील एका संशोधनातून तर भलतीच माहिती समोर आली आहे.

लंडन, 25 नोव्हेंबर : कोरोना रोखण्यासाठी मास्क, सॅनिटाझिंग आणि सुरक्षित अंतर राखण्यास सांगितले जात आहे. मात्र, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाबाबत (Coronavirus Infection) एक नवीन संशोधन समोर आलं आहे. केंब्रिज विद्यापीठाच्या अभियंत्यांनी केलेल्या या संशोधनात असा दावा करण्यात आला आहे की, कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) पुरेसे नाही. एखाद्या ठिकाणी बसलेला कोरोना संक्रमित व्यक्ती दोन मीटर अंतरावर असलेल्या कोणालाही संक्रमित करू शकतो.

केंब्रिज विद्यापीठातील अभियंत्यांच्या पथकाने लोक खोकल्यावर किंवा शिंकल्यावर बाहेर पडणारे ड्रॉपलेट कसे पसरतात हे निर्धारित करण्यासाठी संगणक मॉडेलिंगचा वापर केला. यात मास्क नसताना कोविड-19 संक्रमित व्यक्ती बंद स्थानापासून दोन मीटर अंतरावर दुसऱ्यालाही संसर्ग करू शकतो, असे आढळून आले आहे. दोन मीटर हे अंतर ब्रिटनमध्ये वापरले जात आहे.

खोकल्याचा परिणाम मोठ्या भागावर होतो

खोकणे किंवा शिंकण्याचा परिणाम मोठ्या परिसरावर होत असल्याचे संशोधनातून समोर आले आहे. सार्वजनिक आरोग्य प्राधिकरणानुसार तथाकथित 'सुरक्षित' अंतर एक ते तीन मीटर किंवा त्याहून अधिक असू शकते. 'फिजिक्स ऑफ फ्लुइड्स' जर्नलमध्ये या आठवड्यात प्रकाशित झालेल्या अभ्यासाचे पहिले लेखक भारतीय वंशाचे डॉ. श्रेय त्रिवेदी म्हणाले, "या आजाराच्या प्रसाराचा एक भाग विषाणूशास्त्राशी संबंधित आहे, म्हणजेच तुमच्या शरीरात किती विषाणू आहेत? आपण बोलताना किंवा खोकताना किती विषाणूजन्य घटक बाहेर पडतात हे महत्वाचे आहे.

संशोधनाचा सारांश असा आहे की सोशल डिस्टन्सिंग हा विषाणूचा प्रभाव कमी करण्याचा योग्य मार्ग नाही. विशेषत: येणाऱ्या हिवाळ्यात लसीकरण, हवेची स्थिती आणि मास्क यांचे महत्त्व अधोरेखित करते.

संसर्ग प्रामुख्याने श्वासोच्छवासाच्या द्रव्यातून प्रसारित होतो

त्याचवेळी, यूएसच्या सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन ((Centers for Disease Control and Prevention)) च्या अभ्यासात असे म्हटले आहे की मुख्यतः लोकांना श्वासोच्छवासातील द्रवपदार्थाचा संसर्ग होतो, ज्यामध्ये संसर्ग होण्यास सक्षम व्हायरस असतो. बंद खोलीत आणि खराब हवेत हा विषाणू दीर्घकाळ हवेत तरंगताना आढळतो. हवेत एक मीटरपेक्षा जास्त तरंगत राहून लोकांना संक्रमित करण्याची यात क्षमता आहे. म्हणूनच सीडीसी गाइडलाईन्स बंद घरातील लोकांना मास्क, सुरक्षित अंतर आणि प्रॉपर व्हेंटिलेशन यावर लक्ष देण्यास सांगते.

पूर्ण लसीकरणानंतरही होतेय डेल्टा व्हॅरिएंटची लागण

सध्या कोरोनाप्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे जगभरात हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. कोरोनाप्रतिबंधक लशीचे (Corona Vaccine) दोन्ही डोस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होण्याचा धोका कमी होत असल्यामुळे सगळीकडेच अनलॉक (India Unlock) करण्यात येत आहे; पण असं असलं तरी दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींनीही खबरदारी बाळगण्याचा सल्ला वैज्ञानिक देत आहेत. याला कारण म्हणजे, कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हॅरिएंटची (Delta Variant) पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही लागण होऊ शकते, असं एका संशोधनात (Delta variant research) समोर आलं आहे. विशेष म्हणजे याबाबत बाहेरच्या देशात नाही, तर दिल्लीच्याच दोन रुग्णालयांमध्ये संशोधन करण्यात आलं.

First published:

Tags: Corona, Corona spread, Corona vaccination