कोरोनाविरोधी शस्त्र आहेत भारताच्या 'या' योजना; ऑस्ट्रेलियातील भारतीय शास्त्रज्ञाकडूनही कौतुक

कोरोनाविरोधी शस्त्र आहेत भारताच्या 'या' योजना; ऑस्ट्रेलियातील भारतीय शास्त्रज्ञाकडूनही कौतुक

भारतातील प्रमुख दोन योजनांची कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी मदत होते आहे, असं या शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मे : भारतात (India) कोरोनाव्हारसची (coronavirus) प्रकरणं वाढत असली तरी विकसित देशांच्या तुलनेत भारत कोरोनाविरोधात खूप चांगला लढा देत आहे. भारत कोरोनाव्हायरसशी दोनहात करत असताना भारतातील दोन प्रमुख योजनांचं ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय शास्त्रज्ञाने कौतुक केलं आहे.

भारताची स्वच्छ भारत अभियान (Swacch Bharat Abhiyan) आणि आयुष्मान भारत (Ayushman Bharat Yojana) या दोन्हीही योजना कोरोनाव्हायरसशी लढण्यासाठी मदत करतील असं, ऑस्ट्रेलियातील भारतीय शास्त्रज्ञ एस. एस. वासन म्हणालेत. कॉमनवेल्थ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये (CSIRO) कोरोनाविरोधी लस बनवणाऱ्या टीमचं ते नेतृत्व करत आहेत.

हे वाचा - तब्बल 2 महिन्यांनंतर घरी आली कोरोना योद्धा आई; मुलींनी काय केलं पाहा VIDEO

एस. एस. वासन (S S Vasan) म्हणाले, "भारतातील आरोग्य आणि स्वच्छतेसाठी असलेल्या प्रमुख योजना कोरोनाव्हायरला टक्कर देऊ शकतात. कारण या योजनांमार्फत लोकांमध्ये वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झालेली आहे"

आयुष्मान भारत योजना ही भारताच्या राष्ट्रीय आरोग्य योजनेचा भाग आहे. गरीबांना मोफत आरोग्य सेवा देणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. तर स्वच्छ भारत अभियान ही स्वच्छतेसाठी भारत राबवण्यात आलेली सर्वात मोठी चळवळ आहे.

हे वाचा - आता भारतात कोरोना रुग्णांना दिलं जाणार अमेरिकेचं औषध

"जर आपण स्वच्छ भारत अभियान, आयुष्मान भारत योजना यासारख्या पायाभूत योजना राबवल्या तर संसर्गजन्य आजारांचा भार कमी कमी होण्यास मदत होईल आणि सध्या मोठ्या प्रमाणात वाढत असलेल्या असंसर्गजन्य आजारांशी लढण्यासाठी संसाधनं वापरता येतील", असं वासन म्हणालेत.

भारतात आतापर्यंत कोरोनाव्हायरसचे 207615 रुग्ण आहेत. 100303 रुग्ण बरे झालेत आणि 5815 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

संपादन - प्रिया लाड

First published: June 3, 2020, 7:55 PM IST

ताज्या बातम्या