नवी दिल्ली, 29 डिसेंबर : ब्रिटनमध्ये (Britain) कोरोनाचा नवा स्ट्रेन (new strain of Coronavirus?) वेगानं पसरतो आहे. या नव्या प्रकारापासून आपापल्या नागरिकांचा (citizens) बचाव करण्यासाठी प्रत्येक देश आपापल्या परीनं उपाययोजना करत आहेत.
भारतात सरकारही (Indian Government) याला अपवाद नसून विविध पातळ्यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना केंद्रीय आरोग्य मंत्रालय (Ministry of Health) करते आहे. आरोग्य मंत्रालयानं मागच्या काही काळात ब्रिटनमधून भारतात आलेल्या लोकांसाठी विशेष आदेश काढले आहेत. मागील 14 दिवसात (9 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2020) या काळात भारतात आलेले आंतरराष्ट्रीय प्रवासी (international tourists) जर कोरोनाच्या लक्षणांनी ग्रस्त असतील आणि त्यांची चाचणी पॉजिटिव्ह आली असेल, तर त्यांची जीनोम सिक्वेन्सिंग (genome sequencing) केलं जाणार आहे.
ब्रिटनमधून भारतात आलेल्या सहा लोकांच्या नमुन्यांमध्ये सार्स-सीओवी 2 चं नवीन रूप आढळून आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी सांगितलं, की बंगळुरू इथल्या राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि स्नायू विज्ञान हॉस्पिटल (निमहांस)मध्ये आलेले तीन नमुने, हैद्राबाद इथल्या सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी(सीसीएमबी)मध्ये आलेले दोन नमुने आणि पुण्यातील विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयवी) आलेल्या एका नमुन्यात विषाणूचं नवं रूप सापडलं.
📍Major Highlights:
✅INSACOG, a consortium of 10 government labs starts genome sequencing of SARS- CoV-2 variant: Secretary @MoHFW_INDIA#StaySafe #IndiaWillWin #Unite2FightCorona pic.twitter.com/40YUDesh4Q
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) December 29, 2020
जीनोम सिक्वेन्सिंग म्हणजे काय?
Genome Sequencing हा एखाद्या विषाणूचा बायोडाटा असतो. एखादा विषाणू कसा दिसतो, कसा आहे याची माहिती या माध्यमातूनच मिळते. याच विषाणूच्या विशाल समूहाला जीनोम म्हटलं जातं. विषाणूबाबत जाणण्याच्या प्रक्रियेला जीनोम सिक्वेन्सिंग म्हणतात.
आरोग्य मंत्रालयानं सांगितलं, की या सगळ्या लोकांना विशिष्ट आरोग्य केंद्रांमध्ये वेगळ्या स्वतंत्र कक्षांमध्ये ठेवलं गेलं असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वारंटाइन केलं गेलं आहे. या लोकांसोबत प्रवास केलेलं लोक, या लोकांचे कुटुंबीय यांचा शोध घेणं सुरू आहे. इतर नमून्यांचीही जीनोम तपासणी केली जातेय.
पुढं मंत्रालयानं सांगितलं, परिस्थितीवर आम्ही करडी नजर ठेऊन आहोत. सावधगिरी अजून वाढवणं, संसर्ग रोखणं, तपासणी वाढवणं आणि नमुन्यांना प्रयोगशाळेत पाठवणं या गोष्टींसाठी राज्यांना सतत मार्गदर्शन देणं सुरू आहे.
सर्वात आधी ब्रिटनमध्ये सापडलेलं विषाणूचं नवं स्वरूप आता डेन्मार्क, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, इटली, स्वीडन, फ्रांस, स्पेन, स्वित्झर्लंड, कॅनडा, जपान, लेबनॉन आणि सिंगापूरमध्येही सापडलं आहे. मंत्रालयानं सांगितलं, की 25 नोव्हेंबरपासून 23 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत ब्रिटनहुन आलेले जवळपास 33 हजार प्रवासी विविध भारतीय विमानतळांवर उतरले.