Home /News /coronavirus-latest-news /

अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या 14 वर्षीय मुलीनं शोधला कोरोनावर उपाय, जिंकले 18 लाख

अभिमानास्पद! भारतीय वंशाच्या 14 वर्षीय मुलीनं शोधला कोरोनावर उपाय, जिंकले 18 लाख

भारतीय वंशाच्या 14 वर्षीय अनिका चेब्रोलूने 2020 3M चॅलेंज जिंकत 25 हजार डॉलर म्हणजेच 18 लाख 35 हजार 375 रुपयांचे बक्षीस जिंकले आहे.

    टेक्सस, 19 ऑक्टोबर : जगभरातील वैज्ञानिक कोरोनाव्हायरसवर उपचार शोधण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहेत. अशातच एका 14 वर्षीय मुलीनं कोरोनावर उपचार शोधत सर्वांना थक्क केलं आहे. भारतीय वंशाच्या 14 वर्षीय अनिका चेब्रोलूने 2020 3M चॅलेंज जिंकत 25 हजार डॉलर म्हणजेच 18 लाख 35 हजार 375 रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. अनिकानं कोव्हिड -19वर संभाव्य थेरपी पुरवण्याचा शोध लावला आहे. अनिकानं शोधलेल्या थेरपीमुळे कोरोना रुग्णाला बरे केले जाऊ शकते. अनिकानं SARS-CoV-2 व्हायरसच्या स्पाइक प्रोटीनला बांधण्यासाठी एक रेणू (Molecule) शोधला. यासाठी तिने इन-सिलिको पद्धत वापरली आहे. या प्रोजेक्टबाबत सीएनएनशी बोलताना अनिका म्हणाली की, "गेल्या दोन दिवसात, मी पाहिले की माझ्या प्रोजेक्टबाबत चर्चा होत आहे. यात सार्स-कोव्ही -2 व्हायरसचा समावेश आहे आणि ही थेरपी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करेल. आपण सर्वांनी पूर्वीप्रमाणे आयुष्य जगावे, असे मलाही वाटतं." वाचा-GOOD NEWS! 'या' तारखेला भारत कोरोनामुक्त होणारच, सरकारी पॅनलचा दावा चीनमधून पसरलेल्या या व्हायरसनं जगभरात 1.1 दशलक्षाहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी सेंटर फॉर सिस्टिम्स सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या आकडेवारीनुसार अमेरिकेमध्ये 2 लाख 19 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय अमेरिकन असलेली अनिका 8वीत असताना तिने हा प्रोजेक्ट सादर केला होता. मात्र ही थेरपी कोव्हिड-19च्या उपचारासाठी उपयुक्त ठरेल याची तिला कल्पना नव्हती. सुरुवातीला, इन्फ्लूएंझा व्हायरसच्या प्रोटिनशी बांधले जाणारे लीड कंपाऊंड ओळखण्यासाठी इन-सिलिको पद्धती वापरण्याचे तिचे लक्ष्य होते. वाचा-देशातल्या काही भागात कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन- केंद्रीय आरोग्यमंत्री अनिका म्हणाली की, " कोरोना व्हायरस त्याच्या औषधांविषयी मी बराच वेळ संशोधन करत होते. आपण असं जगत आहोत हा विचारही वेडेपणा आहे. कोव्हिड-19 सर्व जगभर पसरत आहे. या व्हायरसच्या प्रचंड तीव्रतेमुळे आणि इतक्या अल्पावधीत जगावर याचा परिणाम झाला. त्यामुळे मी, माझ्या गुरूंच्या मदतीने, SARS-CoV-2 ची दिशा बदलण्याचा विचार केला." वाचा-भारतात कोरोनाचं रूप बदललं नाही, PMOनं लशीबाबत दिली महत्त्वपूर्ण माहिती 1918 च्या फ्लू हा साथीचा रोगानं अमेरिकेत थैमान घातले होते. दरवर्षी हजारो लोकं मृत्यूमुखी पडत होते. प्रतिवर्षी लसीकरण आणि अँटी-इन्फ्लूएन्झा औषधं बाजारात असूनही मृतांची संख्या वाढत होती. अनिकाचा हा प्रोजेक्ट 3M Young Scientist Challengeमध्ये दाखल करण्यात आला होता. दरम्यान अनिकानं असेही सांगितले की, तुला युवा शास्त्रज्ञाचा पुरस्कार मिळाला असला तरी तिचं काम संपले नाही आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या