कोरोनाचा कहर थांबेना! सलग आठव्या दिवशी 50 हजारहून अधिक रुग्णांची नोंद, मृतांचा आकडा 40 हजार पार

आज सलग आठव्या दिवशी 50 हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात तब्बल 26 हजार 282 नवीन रुग्ण सापडले तर, 904 जणांचा मृत्यू झाला.

आज सलग आठव्या दिवशी 50 हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात तब्बल 26 हजार 282 नवीन रुग्ण सापडले तर, 904 जणांचा मृत्यू झाला.

  • Share this:
    नवी दिल्ली, 06 ऑगस्ट : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाही आहे. आज सलग आठव्या दिवशी 50 हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली. गेल्या 24 तासात तब्बल 26 हजार 282 नवीन रुग्ण सापडले तर, 904 जणांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 19 लाख 64 हजार 537 झाली आहे. तर मृतांचा आकडा हा 40 हजार 699 झाला आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, संध्या देशात 5 लाख 95 हजार 501 सक्रीय रुग्ण आहेत. तर 13 लाख 28 हजार 337 रुग्ण निरोगी झाले आहेत. हा दिलासादायक बाब असली तरी, कोरोनाबाधितांचा वाढता आकडा चिंतेचा विषय आहेत. अमेरिका, ब्राझील, भारत आणि मेक्सिको हे सर्वात जास्त प्रभावी देश आहेत. या देशांमध्ये मृतांची संख्या सर्वात जास्त आहे. अमेरिकेत आतापर्यंत 49 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर, 1 लाख 60 हजार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात 10 हजार नवीन रुग्णांची नोंद बुधवारी महाराष्ट्रात पुन्हा एकदा 10 हजारांहून अधिक संख्येने नवे Corona रुग्ण सापडले. याशिवाय 334 जणांचा मृत्यूही नोंदला गेला आहे.1 ऑगस्टपासून राज्यात पुनःश्च हरिओम अर्थात mission begin again ची घोषणा केली असतानाच आज महाराष्ट्रातून (Coronavirus maharashtra updates) धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात 10,309 कोरोनारुग्णांचं निदान झालं. गेले काही दिवस दहा हजारांच्या आसपास नव्या कोरोनारुग्ण सापडत आहेत. त्यात सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यातून आहे. इतर राज्यांची परिस्थिती जगात तब्बल 7 लाख लोकांचा मृत्यू जगभरात आतापर्यंत 7 लाख 5 हजार कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 87 लाख आहे. WHOच्या वतीने कोरोनाव्हायरसला 11 मार्च रोजी साथीचा रोग घोषित केले होते. आतापर्यंत जगभरात अमेरिका हा कोरोनाचा हॉट स्पॉट झाला आहे. येथे कॅलिफोर्निया, टेक्सास आणि फ्लोरिडासह अनेक राज्यात संक्रमणाचा प्रसार वाढत आहे. एका आकडेवारीनुसार अमेरिकेत दररोज 1000 हून अधिक संक्रमित लोक मरत आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या 2 आठवड्यात जगभरातील आकडेवारीतून असे समोर आले आहे की, 24 तासांत 5900 लोकांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ प्रत्येक तासाला 247 आणि प्रत्ये 15 सेकंदात एकाचा मृत्यू होत आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published: