नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर : देशातील एकूण कोरोनाबाधितांचा (Covid-19 Infected) आकडा जरी 71 लाख 75 हजार 881 झाला असला तरी रुग्णांच्या संख्येत मात्र घट होत आहे. गेल्या 24 तासांत 55 हजार 342 नवीन रुग्ण सापडले. तर एकाच दिवसात 78 हजार 194 रुग्ण निरोगी झाले. 24 तासांच 706 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आतापर्यंत एकूण मृतांची संख्या 1 लाख 9 हजार 856 झाली आहे. तर, आतापर्यंत 62 लाख 27 हजार 296 रुग्ण निरोगी झाले आहेत.
देशाचा रिकव्हरी रेट दिवसेंदिवस वाढत असून अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होत आहे. गेल्या 26 दिवसांत अॅक्टिव्ह रेटमध्ये 15% घट झाली आहे. 16 सप्टेंबर रोजी 10.17 लाखच्या पीकवर होता आता 8.37 लाख रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.
वाचा-Vaccine दिलेल्या रुग्णाला झाला विचित्र आजार, जॉन्सन अँड जॉन्सनची ट्रायल थांबवली
India reports a spike of 55,342 new #COVID19 cases & 706 deaths in the last 24 hours. Total case tally stands at 71,75,881 including 8,38,729 active cases, 62,27,296 cured/discharged/migrated cases & 1,09,856 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/XRVq730KDG
— ANI (@ANI) October 13, 2020
वाचा-मुंबईत COVID हॉस्पिटलच्या ICUला आग, जीव धोक्यात घालून वाचवले 39 रुग्णांचे प्राण
तर, भारताचा रिकव्हरी रेट 85 टक्के आहे. याचा अर्थ 62 लाख रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, 8 लाख 38 हजार 729 रुग्ण अॅक्टिव्ह आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तामिलनाडुमध्ये कोरोनाव्हायरसचा अॅक्टिव्ह रेट, मृत्यूदर आणि रिकव्हरी रेट सर्वात जास्त आहे.
आतापर्यंत किती झाल्या टेस्टिंग?
ICMRनं दिलेल्या आकडेवारीनुसार 12 ऑक्टोबरपर्यंत देशात 8 कोटी 89 लाख 45 हजार 107 सॅंपल टेस्ट झाले आहेत. यातील 10 लाख 73 हजार 014 सॅंपलची टेस्टिंग काल करण्यात आली. सध्या देशाता पॉझिटिव्हिटी रेट सात टक्के आहे.
वाचा-भारतात कोरोना मृत्यूंची संख्या कमी असण्याचं रहस्य; एक चांगलं एक वाईट
जगभरातील परिस्थिती
अमेरिका आणि ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. गेल्या 24 तासांत अमेरिकेत 45 हजार 791 रुग्ण सापडले. तर 316 रुग्णांचा मृत्यू झाला. ब्राझीलमध्ये 8429 नवीन रुग्ण सापडले तर 203 लोकांचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus