Home /News /coronavirus-latest-news /

जगभरातील 38 टक्के कोरोना रुग्ण एकट्या भारतात, 'या' बाबतीतही सर्व देशांना टाकलं मागे

जगभरातील 38 टक्के कोरोना रुग्ण एकट्या भारतात, 'या' बाबतीतही सर्व देशांना टाकलं मागे

संपूर्ण जगभरातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येतील 38 टक्के रुग्ण हे एकट्या भारतातील (Corona Cases in India) आहेत. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत ही टक्केवारी सर्वाधिक आहे.

    मुंबई 27 एप्रिल : देशात मागील जवळपास एका आठवड्यापासून रोज तीन लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची (Corona Cases in India) नोंद होत आहे. यासोबत संपूर्ण जगभरातील एकूण कोरोना रुग्णांच्या संख्येतील 38 टक्के रुग्ण हे एकट्या भारतातील आहेत. जगभरातील इतर देशांच्या तुलनेत ही टक्केवारी सर्वाधिक आहे. जॉन हॉपकिंस विद्यापीठाच्या माहितीनुसार, एका महिन्यापूर्वी हा आकडा 9 टक्के होता. मात्र, आता थेट 29 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि आता हा आकडा 38 टक्क्यांवर पोहोचला आहे. सोमवारबद्दल बोलायचं झाल्यास देशात 3,23,144 नवीन कोरोना (Corona Update) रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2,771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. Covid-19 Vaccine: राज्य सरकारचं सीरमला पत्र, केली 'ही' मागणी कोरोनाची दुसरी लाट झपाट्यानं पसरताना दिसत आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1,76,36,307 वर पोहोचली आहे. याशिवाय मृतांचा आकडाही 2 लाखाच्या आसपास पोहोचत असून 1,97,894 इतका झाला आहे. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की सत्य परिस्थितीच्या तुलनेत हा आकडा खूप कमी आहे. याचं कारण हे आहे, की गावांमध्ये चाचण्यांचं प्रमाण खूप कमी आहे. ग्रामीण भागातील चाचण्यांमध्ये वाढ केल्यास रुग्णसंख्येतही मोठी वाढ नोंदवली जाणार आहे. ही राष्ट्रीय आणीबाणी, न्यायालय शांत राहू शकत नाही; SC नं केंद्राला फटकारलं जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या एकूण बाधितांच्या संख्येपैकी 5 टक्के असल्यास महामारी नियंत्रणात असल्याचं म्हणता येऊ शकतं. मात्र, अमेरिकेपासून भारतापर्यंत जगातील अनेक देशांमध्ये पॉझिटिव्ही रेट खूप जास्त आहे. अमेरिकेत हा आकडा 7 टक्के आहे, तर भारतात 25 टक्के आहे. ब्रिटननं याबाबतीत मागील काही दिवसांमध्ये मोठं यश मिळवलं असीन याठिकाणचा आकडा 0.2 टक्के आहे. भारतासाठी आणखी एक चिंतेची बाब म्हणजे लसीकरणाची (Corona Vaccination) प्रक्रियादेखील अत्यंत धिम्या गतीनं सुरू आहे. आतापर्यंत देशात 14 कोटी लोकांनाच लस दिली गेली आहे. जे एकूण लोकसंख्येच्या 10 टक्केही नाहीत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Corona spread, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या