मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाची लस घेण्यासाठी Co-WIN अ‍ॅपवर कशी कराल नोंदणी?

कोरोनाची लस घेण्यासाठी Co-WIN अ‍ॅपवर कशी कराल नोंदणी?

सगळेच कोविड लशीची (Covid-19 Vaccine) आतुरतेने वाट बघत आहेत आणि आता  भारतात लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सरकारने Co-WIN app आणलं आहे.

सगळेच कोविड लशीची (Covid-19 Vaccine) आतुरतेने वाट बघत आहेत आणि आता भारतात लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सरकारने Co-WIN app आणलं आहे.

सगळेच कोविड लशीची (Covid-19 Vaccine) आतुरतेने वाट बघत आहेत आणि आता भारतात लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी सरकारने Co-WIN app आणलं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : देशात कोविड-19च्या लसीकरणाची प्रक्रिया अजून सुरू व्हायची आहे; मात्र ती सुरळीतपणे आणि कोणत्याही त्रासाविना पार पडावी, म्हणून केंद्र सरकार नियोजन करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून को-विन (Co-WIN) हे मोबाइल अ‍ॅप (Mobile App) सरकारकडून (Union Government) विकसित केलं जात आहे. त्याद्वारे नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करता येणार असून, सरकारी यंत्रणेलाही लसीकरण कार्यक्रमाचा आढावा घेणं सोपं होणार आहे. हे अ‍ॅप गुगल प्ले स्टोअर, अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरसह जिओ फोन्सवरही उपलब्ध होण्याची शक्यता आहे; मात्र ते अ‍ॅप कधी उपलब्ध होणार याबद्दलची माहिती सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही.

नागरिकांना आपल्या आजूबाजूच्या कोविड-19 पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कळावी म्हणून केंद्र सरकारने मार्चमध्ये ‘को-विन 20’ (Co-WIN 20) नावाचं अॅप विकसित करायला सुरुवात केली. ते अ‍ॅप त्यानंतर आरोग्यसेतू (Arogya Setu) या नावानं सादर करण्यात आलं. गुगल प्ले स्टोअरवरून ते आतापर्यंत १० कोटीहून जणांनी डाउनलोड केलं आहे. आता ‘को-विन’ अ‍ॅप विकसित करण्याचं काम सुरू असून, त्याचा उद्देश वेगळा आहे.

याच आठवड्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सरकारतर्फे ‘को-विन’ अ‍ॅपच्या (Co-WIN App) वापराबद्दलची माहिती देण्यात आली. कोविड-19 लसीकरण करणाऱ्या यंत्रणांना लसीकरणाच्या कामाचा आढावा घेता यावा, तसंच नागरिकांना लसीकरणासाठी नोंदणी करता यावी, यासाठी हे अ‍ॅप वापरलं जाणार आहे.

अ‍ॅडमिनिस्ट्रेटर मोड्युल, रजिस्ट्रेशन मोड्युल, व्हॅक्सिनेशन मोड्युल, बेनिफिशियरी अ‍ॅक्नॉलेजमेंट मोड्युल आणि रिपोर्ट मोड्युल अशी पाच मोड्युल्स या अॅपमध्ये असतील. सामान्य नागरिकांना रजिस्ट्रेशन मोड्युलद्वारे लसीसाठी नोंदणी करता येईल. को-मॉर्बिडिटीबद्दलची (Co-morbidity) सर्वेक्षणातून मिळालेली, तसंच स्थानिक यंत्रणेकडची माहिती ‘को-विन’ अ‍ॅपमध्ये अपलोड केली जाणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.

लसीकरण (Vaccination) यंत्रणा राबवणाऱ्यांना ती योग्य पद्धतीने राबवण्यासाठी आणि समन्वयासाठी अॅडमिनिस्ट्रेटर मोड्युलचा उपयोग होईल. लस घेणाऱ्या व्यक्तीची माहिती आणि त्याने लस घेतली आहे की नाही, याची माहिती व्हॅक्सिनेशन मोड्युलमध्ये नोंदवली जाईल. नागरिकाने लस घेतल्यानंतर क्यू-आर कोडवर आधारित सर्टिफिकेट्स तयार करण्याचं, तसंच संबंधित नागरिकाला एसएमएस पाठवण्याचं काम बेनिफिशियरी अॅक्नॉलेजमेंट मोड्युलद्वारे केलं जाईल. लसीकरणाची किती सत्रं पार पडली, एकूण किती जणांचं लसीकरण पूर्ण झालं आदी माहितीचे अहवाल तयार करण्याचं काम रिपोर्ट मोड्युलद्वारे केलं जाईल.

लशींची साठवणूक केलेल्या शीतगृहांमधल्या (Cold Storage) तापमानाची रिअल टाइम माहिती मुख्य सर्व्हरला पाठवण्याचं कामही को-विन अॅपद्वारे केलं जाईल, असं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.  सप्टेंबर 2020मध्ये सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजन्स नेटवर्क यंत्रणेच्या विस्तारीकरणाचा हा भाग आहे.

भारतात फायझर (Pfizer), सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) आणि भारत बायोटेक (Bharat Biotech) या तीन कंपन्यांनी आपली लस तातडीने वापरण्याची परवानगी मिळावी, यासाठी सरकारकडे अर्ज केला आहे. आरोग्य यंत्रणेत कार्यरत असलेल्या सुमारे एक कोटी कर्मचाऱ्यांना ही लस प्राधान्याने दिली जाणार असल्याचं भूषण यांनी स्पष्ट केलं आहे. सर्वसामान्य नागरिकांचं लसीकरण नंतरच्या टप्प्यात होणार असलं, तरी नागरिक को-विन अॅपद्वारे नोंदणी करू शकणार आहेत.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Covid19