चिंता वाढली! 24 तासांत सापडले 75 हजारहून अधिक रुग्ण, मृतांची संख्या 60 हजार पार

गेल्या 24 तासांत तब्बल 75 हजार 760 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, एकाच दिवसात सर्वाधिक 1023 रुग्णांचा मृत्यू झाला.

गेल्या 24 तासांत तब्बल 75 हजार 760 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, एकाच दिवसात सर्वाधिक 1023 रुग्णांचा मृत्यू झाला.

  • Share this:
    नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या संख्येनं वाढ होत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 75 हजार 760 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, एकाच दिवसात सर्वाधिक 1023 रुग्णांचा मृत्यू झाला. याआधी भारतात 22 ऑगस्ट रोजी सर्वाधिक 69 हजार 878 रुग्णांची नोंद झाली आहे. पहिल्यांदाच देशातील कोरोना रुग्णांची संख्या 75 हजार पार झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 7 लाख 25 हजार 99 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 25 लाख 23 हजार 772 रुग्ण निरोगी झाले आहेत. तर, 60 हजार 472 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यांची स्थिती भारताच्या तुलनेत अमेरिका आणि ब्राझीलमध्ये 20 ते 25 हजार कमी रुग्ण सापडत आहे. आकडे पाहिल्यास भारतात आता प्रत्येक 10 लाखांमध्ये 27 हजार 243 रुग्णांची कोरोना चाचणी होत आहे. यात 2,393 रुग्ण पॉझिटिव्ह सापडत आहेत. सर्वाधिक अॅक्टिव्ह केसेस असलेल्या देशांमध्ये भारत आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राझीललं भारतानं मागे टाकले आहे. तर, पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published: