• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • भारताला मोफत मिळणार महागडी Moderna कोरोना लस; WHO कडून मोठा दिलासा

भारताला मोफत मिळणार महागडी Moderna कोरोना लस; WHO कडून मोठा दिलासा

मॉडर्ना (Moderna) कोरोना लस अनेक श्रीमंत देशांमध्ये दिली जाते आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 जुलै : भारतात जास्तीत जास्त कोरोना लशी (Corona vaccine in india) उपलब्ध करून कोरोना लसीकरणाला (Corona vaccination in india) वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुतनिक V नंतर आता लवकरच अमेरिकेची मॉडर्ना (Moderna) कोरोना लसही (Moderna corona vaccine) भारतात दिली जाणार आहे. अनेक श्रीमंत देशांमध्ये ही लस दिली जाते आहे. पण अशी महाग कोरोना लस भारताला (Moderna vaccine in india) मात्र मोफत मिळणार आहे. अमेरिकेतील मॉडर्ना लशीला भारतात आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. भारतात ही लस आयात केली जाणार आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यादरम्यान कोवॅक्स अंतर्गत भारताला ही लस अनुदान म्हणून दिली जाणार आहे, अशी घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. कोवॅक्स ही अशी जागतिक स्तरावरील सुविधा आहे, जिथून गरजू, गरीब, विकसनशील देशांना लशीचा पुरवठा केला जातो आहे. मॉडर्ना लशीचे 7.5 दशलक्ष डोस कोवॅक्समार्फत भारतात अनुदान म्हणून दिले जातील, अशी माहिती WHO च्या सूत्रांनी दिली आहे. हे वाचा - 6 ते 12 वयोगटातील मुलांना Covaxinचा दुसरा डोस ही लस मॅसेंजर RNA वर आधारित आहे. जी पेशींना कोरोनाविरोधात रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी उत्तेजित करते. क्लिनिकल ट्रायलनुसार ही लस 94.1 टक्के प्रभावी आहे. याचे फार गंभीर दुष्परिणाम समोर आले नाही आहे. ही लस कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवरही प्रभावी असल्याचं सांगितलं जातं आहे. जगातील अनेक श्रीमंत देत या लशीचा वापर करत आहेत.  माहितीनुसार या लशीची अमेरिकेत किंमत प्रति डोस 15 डॉलर्स म्हणजे 1,114 रुपये आहे. तर युरोपियन युनिअन नेशन्ससाठी ही लस 18 डॉलर्स म्हणजे जवळपास  1,337 रुपयांना आहे.  प्रचंड पैसा आणि तुलनेने कमी लोकसंख्या असल्याने श्रीमंत देशांनी तर ही लस तयार झाली तेव्हापासून त्या लशींचं बुकिंग आणि साठवणूक सुरू केली होती. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांचा यात समावेश होता. हे वाचा - Explainer : कोरोनाची तिसरी लाट आली? आकडेवारी नेमकी काय संकेत देतेय? भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या आणि विकसनशील देशांत ही लस देणं म्हणजे मोठी कसरत आहे. भारताला प्रत्येक नागरीकाला एक डोज द्यायचा द्यायचा असेल तर किमान 130 कोटींपेक्षा जास्त डोज लागणार आहेत. त्यामुळे त्याचा खर्च आणि उत्पादन हे मोठं आव्हान आहे. पण आता डब्ल्यूएचओच्या निर्णयामुळे भारताला मोठा दिलासा मिळाला आहे.
  Published by:Priya Lad
  First published: