करून दाखवलं! दरदिवशी 70 हजार रुग्ण होत आहेत निरोगी, 'या' 5 राज्यांचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त

करून दाखवलं! दरदिवशी 70 हजार रुग्ण होत आहेत निरोगी, 'या' 5 राज्यांचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त

भारतात निरोगी रुग्णांची संख्या ही अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत 36 लाखांहून अधिक रुग्ण निरोगी झाले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 सप्टेंबर : देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. सध्या देशात 46 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. तर, 9 लाखांहून अधिक रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. मात्र या सगळ्यात दिलासादायक बाब म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट. भारतात निरोगी रुग्णांची संख्या ही अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा जास्त आहे. देशात आतापर्यंत 36 लाखांहून अधिक रुग्ण निरोगी झाले आहे. यासह भारताचा रिकव्हरी रेट 77.77% झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दरदिवशी 70 हजार रुग्ण निरोगी होत आहेत. मे महिन्यात देशात 50 हजार निरोगी रुग्ण होते, आता 4 महिन्यात हा आकडा 36 लाख झाला आहे. यात देशातील 5 राज्यांचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त आहे. यात महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. या पाच राज्यांमधून 60% रुग्ण आतापर्यंत निरोगी झाले आहे.

वाचा-ग्रामीण भागात पसरतोय कोरोना! Sero सर्व्हेचा दुसरा टप्पा असू शकतो आणखी भीषण

एकट्या महाराष्ट्रात 14 हजारहून अधिक रुग्ण शनिवारी निरोगी झाले तर, कर्नाटकातून 12 हजार रुग्ण. याबरोबरच भारताच्या मृत्यूदरातही घट झाली आहे. देशाचा मृत्यूदर 1.66% झाला आहे. शनिवारी देशात तब्बल 97 हजार 570 लोकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली. ब्राझिलला मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानावर पोहोचला. यातील एकट्या महाराष्ट्रात 24 हजार नवीन रुग्ण आढळून आले.

वाचा-आता पुण्यातही पुन्हा सुरू होणार Oxfordच्या मानवी चाचण्या

भारत दुसऱ्या क्रमांकावर

Corona virus ने संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. सर्वच देशांना याचा मोठा फटका बसला असून अमेरिकेपाठोपाठ भारतात दुसऱ्या क्रमांकाचे रुग्ण आहेत. भारताचा कोरोना मृत्यूदर हा 1.7% असून अमेरिकेमध्ये तो 3% तर ब्रिटनमध्ये 11.7% आणि इटलीमध्ये 12.6% आहे. भारतात यशस्वीपणे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे भातातील रिकव्हरी रेट चांगला असला तर दिवसाला नवीन वाढणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला 64 लाख (64,68,388) लोक कोरोना विषाणूच्या धोक्यामध्ये होते असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास 95 हजार दररोज नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: September 13, 2020, 9:22 AM IST

ताज्या बातम्या