मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोना संसर्गाचा आकडा घसरला, पण धोका कायम; भारतासाठी चिंताजनक बातमी

कोरोना संसर्गाचा आकडा घसरला, पण धोका कायम; भारतासाठी चिंताजनक बातमी

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांनी भारताला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांनी भारताला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांनी भारताला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी : भारतातील कोरोना (coronavirus in india) रुग्णांची संख्या कमी झाली आहे. नव्या कोरोना रुग्णांचं प्रमाण लक्षणीयरित्या घटलं आहे. त्यामुळे भारतासाठी ही दिलासादायक बातमी आहे. पण तरी भारतातचा धोका टळलेला नाही. एका संशोधनातून जी माहिती समोर आली आहे, ती भारताची चिंता वाढवणारी आहे.

लँसेटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार ब्राझीलमधील मॅनॉस शहर ज्याला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. या शहरात सर्वाधिक लोकांच्या शरीरात कोरोनाविरोधात अँटिबॉडीज सापडल्या आहेत. तिथं कोरोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. कोरोना पुन्हा उलटला आहे.

कोरोनाची पहिल्यांदा लागण झाल्यानंतर व्हारसविरोधात मिळणारी रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं आणि कोरोनाचा नवा स्ट्रेन हे यामागील कारण असू शकतं, असं तज्ज्ञांनी सांगितलं.  त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) तज्ज्ञांनी भारताला सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक संचालिक पूनम खेत्रपाल सिंह म्हणाल्या, भारत हा विस्तीर्ण आणि वैविध्यपूर्ण असा देशा आहे. त्यामुळे कमी झालेली प्रकरणं म्हणजे देशात हर्ड इम्युनिटी निर्माण झाली हे ठोसपणे सांगणं कठीण आहे. त्यामुळे कोरोनाची प्रकरणं कमी झाली आणि मोठ्या संख्येनं रुग्ण बरे होत असले तरी इतक्या लवकर उत्साहीत होणं योग्य नाही.

हे वाचा - वुहानच्या त्या लॅबमध्ये गेली WHO ची टीम; कोरोनाबाबत केला धक्कादायक खुलासा

मास्क घालणं, स्वच्छता राखणं आणि सोशल डिस्टन्सिंग हे करावंच लागेल. संक्रमण रोखण्याचा हा प्रभावी मार्ग असल्याचं सिद्ध झालेलं आहे. आपण आपले सुरक्षाकवच बाजूला ठेवू शकत नाही,  जितकं व्हायरस आपण पसरू देऊ तितके त्याची नवं रूपं येण्याचा धोका वाढेल, असं त्या म्हणाला.

भारतात सध्या कोरोना लसीकरण मोहीम सुरू आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतात लसीकरणाचा वेग जास्त आहे. इतर देशांनंतर लसीकरण सुरू केल्यानंतर सर्वात जास्त लोकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 37 लोकांचं लसीकरण झालं आहे. जुलैपर्यंत 300 दशलक्ष लोकांचं लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे.

हे वाचा - कधी दिला जाणार कोरोना लशीचा दुसरा डोस? मोदी सरकारनं जारी केली तारीख

भारतात सध्या कोरोनाचे एकूण 10802591 रुग्ण आहेत. त्यापैकी 10496308 रुग्ण बरे झाले आहेत तर 151460 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 154823 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

First published:

Tags: Coronavirus