Home /News /coronavirus-latest-news /

चीनमध्ये भारतीयांना बंदी; अधिकृत व्हिसा किंवा रेसिडेंट परमिट असेल तरी No Entry

चीनमध्ये भारतीयांना बंदी; अधिकृत व्हिसा किंवा रेसिडेंट परमिट असेल तरी No Entry

ही बंदी Coroavirus च्या धोक्यामुळे असल्याचं चिनी दूतावासाने (Chinese Embassy) म्हटलं आहे.

    बीजिंग, 6 नोव्हेंबर : भारत चीन सीमेवर गलवान खोऱ्यात तणाव निर्माण झाल्यानंतर दोन देशांचे संबंधही तणावपूर्ण आहेत. त्यातच आता भारतीयांना देशात येण्यापासून चीनने तात्पुरती बंदी घातल्याची बातमी आहे. ही बंदी Coroavirus च्या धोक्यामुळे असल्याचं चिनी दूतावासाने म्हटलं आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे चीनचा अधिकृत व्हिसा आणि रेसिडंट परमिट असलेल्या भारतीयांनाही चीनमध्ये येण्यास त्या देशाने तात्पुरती बंदी घातली आहे. भारतात असलेल्या चिनी दूतावासाने आपल्या पत्रकात म्हटलंय की भारतातील चिनी दूतावास किंवा कॉन्सुलेट चीनचा अधिकृत व्हिसा किंवा रेसिडंट परमिट असलेल्या भारतीय नागरिकांच्या हेल्थ डिक्लेरेशन फॉर्मला स्टँपिंग देणार नाही. या देशातल्या नागरिकांनाही प्रवेश बंदी भारताबरोबरच ब्रिटन, बेल्जिअम आणि फिलिपाइन्समधील परदेशी नागरिकांनाही चीनमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात वंदे भारत मिशनच्या अंतर्गत एअर इंडियाच्या (Air India) दिल्ली-वुहान विमानाने प्रवास करणाऱ्यांची 30 ऑक्टोबरला कोरोना चाचणी घेतली होती. त्यातील 20 जणांना कोरोना असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. एआयने 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळात चीनसाठी चार उड्डाणांची योजना आखली होती ज्यावर आता परिणाम होऊ शकेल. त्यामुळे भारत सरकार काय भुमिका घेते हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात निवेदन दिले असून यामध्ये म्हटलंय की चिनी डिप्लोमॅटिक सर्व्हिस, कर्टसी आणि सी व्हिसा असलेल्या परदेशी नागरिकांवर या निर्णयाचा परिणाम होणार नाही.  आपातकालीन परिस्थिती किंवा माणुसकीच्या आधारे चीनमध्ये प्रवेश करू इच्छिणारे परदेशी नागरिक चिनी दुतावासात व्हिसासाठी अर्ज करु शकतात. त्याचबरोबर 3 नोव्हेंबरनंतर व्हिसा मान्य झालेल्या नागरिकांना चीनमध्ये प्रवेशास कोणतीही अडचण येणार नाही. त्याचबरोबर करोना संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला असून तात्पुरत्या स्वरुपाचा असेल असं चिनी परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे हा निर्णय फक्त भारतापुरता मर्यादित नसून याआधी इतर देशांसंबंधीही असा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्याने उपाययोजना म्हणून चीन पावलं उचलत आहे. त्यानंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडत होते. त्यामुळे चीनने सावधगिरी म्हणून हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. याशिवाय चीनने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांच्या उड्डाणावर देखील  स्थगिती आणली आहे.
    First published:

    Tags: China, Coronavirus, India china

    पुढील बातम्या