मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /आता लोकल ट्रायलशिवायच दिली जाणार परदेशी कोरोना लस; मोदी सरकारचा मोठा निर्णय

आता लोकल ट्रायलशिवायच दिली जाणार परदेशी कोरोना लस; मोदी सरकारचा मोठा निर्णय

 कोरोना वॅक्सिनच्या दोन डोसमधला गॅप फायदेशीर ?

कोरोना वॅक्सिनच्या दोन डोसमधला गॅप फायदेशीर ?

परदेशी कोरोना लशींचं (Foreign Corona Vaccine) भारतात लोकल ट्रायल करण्याचा नियम सरकारने रद्द केला आहे.

नवी दिल्ली, 27 मे : आतापर्यंत भारतात कोणत्याही लशीला (Corona vaccine) परवानगी देण्याआधी त्या लशीचं क्लिनिकल ट्रायल (Corona vaccine clinical trial) केलं जात होतं. पण आता लशीची मागणी पाहता केंद्र सरकारने लशीला मान्यता देण्याच्या नियमात बदल केले आहेत. सरकारने परदेशी लशींचं (Foreign Vaccine) भारतात लोकल ट्रायल करण्याच्या नियम रद्द केला आहे.

कोरोना लसीकरणाला वेग देण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. चांगल्या परदेशी कोरोना लशींना आता  (Well-established Foreign Vaccine) भारतात ट्रायलशिवायच परवानगी दिली जाणार आहे. याचा अर्थ परदेशी लशींचं भारतात लोकल ट्रायल होणार नाही, असं वृत्त रॉयटर्सने दिलं आहे.

देशात कोरोनाची दुसरी लाट आहेत. त्यामुळे कोरोना प्रकरणं वाढत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचीही शक्यता व्यक्त केली जाते आहे. जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे टप्प्याटप्याने सुरू केलेला लसीकरण कार्यक्रम आता व्यापक स्तरावर राबवला जात आहे. 18+ सर्व नागरिकांचं लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. तर लहान मुलांच्या लसीकरणासाठी क्लिनिकल ट्रायलला मंजुरी देण्यात आली आहे. लहान मुलांनाही लवकरच लस दिली जाईल.

हे वाचा - अरे देवा! ब्लॅक, व्हाइट, येलो आणि आता Cream Fungus; कोरोनानंतर बुरशीचं थैमान

लसीकरण मोहीम व्यापक झाल्याने लस घेणारे नागरिक जास्त आणि लशीचे डोस कमी अशी परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी लशींचा तुटवडा आहे. लशीच्या कमतरतेमुळे काही ठिकाणी लसीकरण तात्पुरतं थांबवलंही जातं आहे. लशींची गरज लक्षात घेता जास्तीत जास्त लस उपलब्ध व्हावेत यासाठी सरकार धडपड करत आहे.

सध्या भारतात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिनचा वापर केला जात आहे. आता रशियाची स्तुपनिक V सुद्धा मिळणार आहे. या लशीचंही भारतात ट्रायल झालं आहे. पण सरकारच्या या नव्या नियमामुळे आता फाझर, जॉन्सन अँड जॉन्सन आणि मॉडर्ना कंपनीच्या लशींचा मार्ग मोकळा होईल. शिवाय जास्तीत जास्त लशी उपलब्ध होतील.

हे वाचा - उपचार आणि बचावही; कोरोनाविरोधात 99 टक्के प्रभावी असं टू इन वन Nasal spray

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील फाइझर कंपनीने आपल्या लशीचे पाच कोटी डोस भारताला देण्यासाठी कयार आहे. यावर्षी इतके डोस देण्याची तयारी आहे. तर मॉडर्ना 2022 पर्यंत भारतात आपली सिंगल शॉट लस लाँच करू शकते. यासाठी भारतातील सिप्ला आणि इतर औषध कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. मॉडर्ना पाच कोटी डोस भारताला देऊ शकते.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Corona vaccine