Home /News /coronavirus-latest-news /

वरात आली...सप्तपदीही झाल्या; पण नवरीला न घेता परतला नवरदेव; असं का झालं?

वरात आली...सप्तपदीही झाल्या; पण नवरीला न घेता परतला नवरदेव; असं का झालं?

सध्या गावात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

    उत्तरराखंड, 7 मे : उत्‍तराखंड येथील अल्मोडाच्या लाट गावात महिलांचा संगीताचा कार्यक्रम झाल्यानंतर वरात येण्याची तयारी सुरू होती. तेव्हाच असा प्रकार घडला की नवरदेवाला रिकाम्या हाताने घरी परतावं लागलं. त्याचं झालं असं की, नवरीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या रिपोर्टबाबत गावकऱ्यांना कळताच येथे गोंधळ उडाला. नवरीचाच कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर गावकऱ्यांनी लग्न घरापासून अंतर ठेवलं. याशिवाय प्रशासनालादेखील नवरी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची सूचना देण्यात आली होती. मात्र तोपर्यंत नवरदेवाची वरात नवरीच्या घरासाठी निघाली होती. कोरोना काळात असं पहिल्यांदा झालं की, लग्न मंडपात पंडितजींनी पीपीई किट घातली होती. सांगितलं जात आहे की, राजस्थानमधील बिकानेरपासून बरात अल्मोंडा पोहोचली तेव्हा नवरीचा कोरोना रिपोर्च पॉझिटिव्ह आला होता. यानंतर गावात गोंधळ उडाला. यानंतर नवरीच्या वडिलांनी मुलीचं लग्न करण्याचं ठरवलं. यानंतर प्रशासनाला याबाबत सूचना देण्यात आली. ज्यानंतर प्रशासनाने पीपीई किट घालून लग्न करण्याती सहमती देण्यात आली आणि नवरा-नवरीने सात फेरे घेतले. हे ही वाचा-खरंच, Covid-19 ची लागण झाल्यामुळे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा मृत्यू? एसडीएम सीमा विश्वकर्मा यांनी सांगितलं की, लग्न झाल्यानंतर नवरी आयसोलेशनमध्ये आहे. कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच नवरी आपल्या सासरी जाऊ शकेल. याशिवाय गावकऱ्यांनाही कोरोना नियमांचं पालन करण्यास सांगण्यात आलं आहे. जर गावातील कोणाचीही तब्येत बिघडली तर संपूर्ण गावाची कोरोना चाचणी करण्यात येईल. त्यामुळे नवरदेवाला नवरीशिवाय घरी परतावं लागलं. लग्न झालं मात्र कोरोनामुळे आता नवरीची पाठवणी दोन आठवड्यांनंतर होईल.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona updates, Covid-19 positive, Marriage

    पुढील बातम्या