मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Corona Vaccination : कोरोना लसीकरणाच्या पुढील टप्प्यात 'या' वयोगटातील नागरिकांना प्राधान्य

Corona Vaccination : कोरोना लसीकरणाच्या पुढील टप्प्यात 'या' वयोगटातील नागरिकांना प्राधान्य

देशभरातील कोरोना (Coronavirus In India) पेशंट्सची संख्या रोज वाढत आहे.त्यामुळे सरकारने कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग देखील वाढवला आहे. आता लवकरच लसीकरणाचा पुढील टप्पा सुरु होणार आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 11 मार्च : देशभरातील कोरोना (Coronavirus In India) पेशंट्सची संख्या रोज वाढत आहे. त्यामुळे सरकारने कोरोना लसीकरणाचा (Corona Vaccination) वेग देखील वाढवला आहे. सध्या लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु आहे. या टप्प्यात सर्व ज्येष्ठ नागरिक तसेच 45 ते 60 या वयोगटातील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींचे लसीकरण करण्यात येत आहे. आता त्यानंतर लवकरच लसीकरणाचा पुढील टप्पा सुरु होणार आहे. या टप्प्यात 50 वर्षांच्या वरील वयोगाटातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

या विषयावर एका सरकारी अधिकाऱ्याने  'हिंदुस्थान टाईम्स' ला दिलेल्या माहितीनुसार, 'कोणत्या वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण कधी करायचे याबाबतचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. देशाची लोकसंख्या 130 कोटी आहे. या सर्वांचे एकाच टप्प्यात लसीकरण शक्य नाही. त्यामुळे सरकारने प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहे. सुरुवातीला कोरोना पेशंट्सच्या सर्वाधिक संपर्कात असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्यात आली. आता सामान्य नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. देशातील सर्व नागरिकांचे त्यांच्या वयानुसार गट पाडण्यात आले आहेत.' असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

2 कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

कोरोना लसीकरणाबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार 50 वर्षांवरील वयोगटातील व्यक्तींचीही दोन गटामध्ये विभागणी करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या गटाला म्हणजेच  45 ते 60 वयोगटातील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना लस देण्याची मोहीम सध्या सुरु आहे. त्यानंतर आता 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील सामान्य नागरिकांना लस देण्यात येणार आहे.

(वाचा : लसीकरण सुरू असताना Covaxin कोरोना लशीबाबत केंद्राने घेतला मोठा निर्णय )

या विषयावरील एका रिपोर्टनुसार, 'गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना लसीकरणाचा वेग गेल्या काही दिवसांमध्ये वाढवण्यात आला आहे. आता लवकरच आणखी एका टप्प्यातील नागरिकांचा त्यामध्ये समावेश करण्यात येईल.

देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोहीम सुरु झाली आहे. गुरुवारी सकाळी 8 वाजेपर्यंत एकूण 2.56, 85,011 नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus