मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

लॉकडाऊनचा नियम मोडून मशिदीत केली गर्दी, पाहा पोलिसांच्या छापेमारीचा Live Video

लॉकडाऊनचा नियम मोडून मशिदीत केली गर्दी, पाहा पोलिसांच्या छापेमारीचा Live Video

एकीकडे गुजरातमधील वडोदरा भागात एक मशीद कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाइन सेंटरमधून उपलब्ध करुन दिल्याचं वृत्त असताना दुसरीकडे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

    गुजरात, 8 मे : एकीकडे गुजरातमधील वडोदरा भागात एक मशीद कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाइन सेंटरमधून उपलब्ध करुन दिल्याचं वृत्त असताना दुसरीकडे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वडोदरा पोलिसांनी एका मशिदीत छापा मारला असता धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वडोदरातील वाडी भागातील आय डोसुमिया मशीदीत पोलिसांनी छापेमारी केली. यादरम्यान तब्बल 60 लोक मशिदीत नमाज पठण करीत असल्याचे दिसून आले. कोरोना काळात नियमावली जाहीर करण्यात आली असून सर्व धार्मिक स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारकडून याबाबतची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील या मशीदीत 60 लोक नमाज पठण करीत असल्याचं दिसल्यानंतर मशीदीच्या तीन संचालकांविरोधात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अॅपेडेमीक अॅक्ट अंतर्गत हा तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे ही वाचा-प्रोटोकॉलचं उल्लंघन करीत कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन; गावात 21 दिवसात 21 मृत्यू कोरोनानं (Coronavirus) देशभरात अक्षरशः थैमान घातलं आहे. याचा सर्वच गोष्टींवर मोठा परिणाम झाला आहे. या कठीण काळातून बाहेर येण्यासाठी लोकं वाट पाहात असतानाच आता नुकतंच समोर आलेली एक स्टडी चिंतेत भर घालणारी आहे. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे, की आता आपल्याला कोरोनासोबतच जगण्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे, की हा विषाणू (Virus) कधीच संपणार नाही. म्हणजेच हा कायम जिवंत राहिल. याचा प्रकोप दिर्घकाळापर्यंत कायम राहाणार आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona spread, Crime news, Gujrat

    पुढील बातम्या