मोठा दिलासा! Remdesivir साठीचे आयात शुल्क रद्द, पुरवठा सुरळीत होऊन किमतीतही होणार घट

मोठा दिलासा! Remdesivir साठीचे आयात शुल्क रद्द, पुरवठा सुरळीत होऊन किमतीतही होणार घट

मंगळवारी रात्री उशिरा या इंजेक्शनासाठी लागणाऱ्या औषधी सामग्रीवरील आयात (imports of Remdesivir API) शुल्क हटवण्यात आले आहेत. यामुळे इंजेक्शनचं देशांतर्गत उत्पन्न वाढवण्यात आणि तुटवडा कमी करण्यात मदत होणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 21 एप्रिल: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असतानाच रेमडेसिवीर (Remdesivir) इंजेक्शनची मागणीही वाढली आहे. यामुळे, याचा मोठा तुटवडा जाणवू लागला आहे. अशात आता केंद्र सरकारनं एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. भारतानं आता रेमडेसिवीरवरील आयात शुल्क हटवले (Import Duty Free) आहेत. मंगळवारी रात्री उशिरा या इंजेक्शनासाठी लागणाऱ्या औषधी सामग्रीवरील आयात (imports of Remdesivir API) शुल्क हटवण्यात आले आहेत. यामुळे इंजेक्शनचं देशांतर्गत उत्पन्न वाढवण्यात आणि तुटवडा कमी करण्यात मदत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे केवळ याची कमतरताच दूर होणार नाही तर किंमतही कमी होईल.

सरकारनं मंगळवारी रेमडेसिवीर, त्याच्यासाठी लागणारा कच्चा माल आणि ते बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर घटकांचे सीमा शुल्क माफ केले आहेत. महसूल विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने ज्या वस्तूंवर शुल्क माफ केले आहे त्यात रेमेडिसवीर, रेमेडिसवीर इंजेक्शन्स आणि बीटा सायक्लोडोडक्स्ट्रिनच्या निर्मितीमध्ये वापरले जाणारे सक्रिय फार्मास्युटिकल साहित्य (एपीआय) यांचा समावेश आहे. आयात शुल्कात ही सूट 31 ऑक्टोबरपर्यंत लागू राहील.

असा देणार लढा? Covid 19 च्या काळात भारतानं दुपटीनं वाढवली ऑक्सिजन निर्यात

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी ट्वीट केले आहे, की कोरोनाच्या उपचारात प्रभावी मानल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाच्या (Remdesivir API) आयातीवर कोणतीही फी आकारली जाणार नाही. याशिवाय रेमडेसिवीर इंजेक्शनची आयातही शुल्कमुक्त करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या घोषणेने हे औषध येत्या काळात देशात पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे, की देशात येत्या 15 दिवसांमध्ये या इंजेक्शनचं उत्पादन दुप्पट केलं जाईल. अनेक राज्यांमध्ये सध्या या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. केंद्रीय मंत्री मांडविया यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं, की भारत सरकार रेमडेसिवीरचं उत्पादन वाढवण्याचा आणि ते कमी किमतीत उपलब्ध करुन देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे.

Published by: Kiran Pharate
First published: April 21, 2021, 9:56 AM IST

ताज्या बातम्या