• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • Coronavirus: आरोग्य मंत्रालय तज्ज्ञांचा सल्ला ऐकायलाही तयार नाही; आता तरी जागे व्हा, IMA चा आरोप

Coronavirus: आरोग्य मंत्रालय तज्ज्ञांचा सल्ला ऐकायलाही तयार नाही; आता तरी जागे व्हा, IMA चा आरोप

IMAनं म्हटलं, की केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आता तरी जागं व्हायला पाहिजे आणि कोरोना महामारीमुळे (Covid-19 Pandemic) उभा ठाकलेल्या संकटांविरोधात लढा देण्यासाठी योग्य ती पाऊलं उचलायला पाहिजे.

 • Share this:
  नवी दिल्ली 09 मे : इंडियन मेडिकल असोसिएशननं (IMA) शनिवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला (Health Ministry) देशातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर सल्ला दिला आहे. IMAनं म्हटलं, की केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आता तरी जागं व्हायला पाहिजे आणि कोरोना महामारीमुळे (Covid-19 Pandemic) उभा ठाकलेल्या संकटांविरोधात लढा देण्यासाठी योग्य ती पाऊलं उचलायला पाहिजे. डॉक्टरांची संघटना असलेल्या IMA नं असा आरोप केला, की आरोग्य मंत्रालयानं कोरोनाची दुसरी लाट (Second Wave of Corona) रोखण्यासाठी योग्य पाऊलं उचलली नाहीत. सोबतच त्यांनी म्हटलं, IMA अशी मागणी करत आहे, की आरोग्य मंत्रालयानं झोपेतून जागं व्हायला पाहिजे आणि कोरोना महामारीमुळे वाढत असलेल्या संकटांना तोंड देण्यासाठी योग्य पाऊलं उचलायला पाहिजेत. हेही वाचा - आरोग्य मंत्र्यांच्या जालन्यात कोरोना रुग्णांची लूट! HRCTसाठी दुप्पट भाव IMA च्या म्हणण्यानुसार, कोरोना महामारीच्या दुसऱ्या भयंकर लाटेमुळे निर्माण झालेल्या संकटासोबत लढण्यासाठी आरोग्य मंत्रालय योग्य पाऊलं आणि निर्णय घेत नाहीये. यात असं म्हटलं आहे, की आयएमए मागील 20 दिवसांपासून आरोग्य सेवा अधिक चांगल्या करण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात सुनियोजित लॉकडाऊन (Lockdown) करण्यावर भर देत आहे. हेही वाचा - माणुसकीही विकून खाली, रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून विकले! डॉक्टरांची संघटना असलेल्या आयएमएनं आरोप केला आहे, की कोरोना महामारीसोबत लढण्यासाठी जे निर्णय घेतले जात आहेत, त्यांचा वास्तविक परिस्थितीसोबत काहीही संबंध नाही. वरती बसलेले लोक जमिनीवरील खरी परिस्थिती समजण्यासाठी तयारच नाहीत. IMA च्या म्हणण्यानुसार, त्यांचे सदस्य आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.
  Published by:Kiran Pharate
  First published: