नवी दिल्ली, 06 मे : कोरोनाव्हायरसपासून (coronavirus) बचाव करण्यासाठी मास्क (Mask) वापरणं हा एक मार्ग आहे. मात्र एकच मास्क पुन्हा वापरता येत नाही. वारंवार तोच वापरणंही धोकादायक आहे. शक्यतो वापरलेला मास्क पुन्हा वापरू नये, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. तरीही काहीजण तसं करतात. मात्र आता आयआयटी दिल्लीनं असा मास्क तयार केला आहे जो पुन्हा वापरता येईल आणि त्यामुळे कोणताही धोका नाही.
आयआयटी दिल्लीने NSafe हे अँटीमायक्रोबिअल मास्क तयार केलं आहे. जो धुवून 50 वेळा वापरता येऊ शकतो. अशा 2 मास्कची किंमत फक्त 299 रुपये आहे तर 4 मास्कची किंमत 598 रुपये आहे.
An #IITDelhi startup "Nanosafe Solutions" has launched an antimicrobial and washable face mask "NSafe", which is reusable up to 50 launderings, thus greatly cutting down the cost of use.#IndiaFightsCOVID19
हा मास्क तयार करणाऱ्या शास्त्रज्ञ डॉ. मंगला जोशी यांनी सांगितलं, "हा सुतीपासून तयार करण्यात आलेला भारतातील पहिला मायक्रोबेरिअल मास्क आहे, ज्याचा वापर पुन्हा पुन्हा करता येऊ शकतो. हा मास्क तुम्ही डिटर्जंटने धुवून आणि उन्हात सुकवून पुन्हा वापरू शकता. याचं उत्पादन सुरू करण्यात आलं आहे"