दिल्ली, 25 एप्रिल : देश कोरोनाच्या लाटेत देशात रुग्ण वाढत आहेत .त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. ऑक्सिजन पुरवठा वाढण्यासाठी बरेच प्रयत्न सुरु आहेत. याचं वेळी फर्टिलायजर कंपनी इफ्को (IFFCO)ने 30 मेला आपला नवीन प्लांट कार्यान्वित होत असल्याची घोषणा केलीये.
उत्तर प्रदेशामधील फूलपूर मध्ये हा प्लँट आहे. महत्वाचं म्हणजे हा प्लांट यूपी आणि आसपासच्या भागातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा विनामूल्य करेल.
(कोरोना काळात दररोज करा ही योगासनं: फुप्फुसं होतील मजबूत)
इफ्को देशात 30 कोटी रुपयांचे चार ऑक्सिजन प्लांट्स सुरु करत आहे. उत्तरप्रदेशात बरेलीमधील आमला आणि प्रयागराजमधील फूलपूर या दोन प्लांट उभारले जात आहेत. ओडिशाच्या पारादीप आणि गुजरातमधील कलोल इथे एकएक प्लांट उभारले जात आहेत. इफकोचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यू.एस. अवस्थी यांनी ट्वीटवरुन ही माहिती दिली आहे. फूलपूरमध्ये तिसरा ऑक्सिजन प्लांट बसविण्याचा आदेश दिला असल्याची माहिती त्यांनी दिलीये.
#IFFCO orders 3rd Oxygen plant for Free Oxygen to hospitals in nation’s service with capacity of 130 Cubic Mtr/hr in its #Phulpur unit in #UttarPradesh. Will commence by 30th May. @narendramodi @PMOIndia @myogiadityanath @myogioffice @DVSadanandGowda @nstomar @mansukhmandviya
— Dr. U S Awasthi (@drusawasthi) April 25, 2021
या प्लांटची क्षमता 130 घनमीटर प्रती तास असेल. याद्वारे रुग्णालयांना मोफत ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल. 30 मे पासून या प्रकल्पाचं काम सुरू होईल. त्यांनी सांगितलं आहे की ओडिशाच्या इफ्कोच्या पारादीप युनिटमध्ये चौथा ऑक्सिजन प्लँट बसविण्याचे कामही जोरात सुरू आहे.
(Covid Crisis: टाटा आले धावून! ऑक्सिजनच्या तुटवड्यानंतर सिंगापूरहून मागवले कंटेनर)
देशात कोरोनाचा स्फोट!
केंद्रीय स्वास्थ मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 24 तासांत 3,49,691 नवीन रुग्ण आढळू आले आहेत. त्याच वेळी, कोरोनामुळे 2,767 लोक मरण पावले आहेत. गेल्या 24 तासांत 2,17,113 लोकही बरे झाले आहेत
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona hotspot, Corona patient, Corona spread, Corona virus in india, Oxygen supply