मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

सणासुदीच्या काळात काळजी न घेतल्यास येऊ शकते कोरोनाची भयावह लाट; तज्ज्ञांचा इशारा

सणासुदीच्या काळात काळजी न घेतल्यास येऊ शकते कोरोनाची भयावह लाट; तज्ज्ञांचा इशारा

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सणासुदीदरम्यान नागरिकांनी पुरेशी काळजी घेतली आणि कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) नवा व्हॅरिएंट (Variant) समोर आला नाही तर दुसऱ्या लाटेसारख्या आपत्तीजन्य परिस्थितीपासून देश वाचेल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : देशातला कोरोनाचा (Corona) धोका अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. तज्ज्ञांनी देशात तिसरी लाट (Third Wave) येण्याचा अंदाज यापूर्वीच वर्तवला आहे. त्यातच आता सणासुदीचा (Festive Season) काळ सुरू आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सणासुदीदरम्यान नागरिकांनी पुरेशी काळजी घेतली आणि कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) नवा व्हॅरिएंट (Variant) समोर आला नाही तर दुसऱ्या लाटेसारख्या आपत्तीजन्य परिस्थितीपासून देश वाचेल, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता कमी झाली असली, तरी याचा अर्थ असा नाही, की ही महामारी स्थानिक (Local) झाली आहे. जेव्हा एखादा रोग एखाद्या विशिष्ट भौगोलिक क्षेत्रात सातत्यानं अस्तित्वात असतो, परंतु त्याचा परिणाम कमी जाणवतो, तेव्हा तो स्थानिक मानला जातो, असं तज्ज्ञांनी सांगितलं. त्यामुळे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी कोरोनाच्या अनुषंगाने सतर्क राहून काळजी घ्यावी, तसच सावधगिरी बाळगावी, असं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.

हे वाचा - ‘चमकोगिरी टाळायला हवी’, उज्ज्वल निकम यांचं नवाब मलिक Vs NCB वादावर परखड भाष्य

देशात दिवाळीसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर तज्ज्ञांनी सांगितलं, की `कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटतेय हा कोरोना संपल्याचा संकेत नक्कीच नाही.` यासाठी तज्ज्ञांनी मृत्युदर, लसीकरण आणि ब्रिटनमध्ये सध्या वाढत असेलल्या रुग्णसंख्येचा संदर्भ दिला आहे. देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने (Vaccination) 100 कोटी डोसचा टप्पा पार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी व्हायरोलॉजिस्ट शाहिद जमील यांनी सांगितलं, की `लसीकरणाचं प्रमाण लक्षणीय वाढलं असलं, तरी त्याला अजून गती मिळणं म्हणजेच लसीकरण वेगात होणं आवश्यक आहे.`

`मला अजूनही खात्री नाही की आपण `स्थानिक` स्थितीत आहोत. 100 कोटी डोस पूर्ण होणं या गोष्टीला आपण मोठं यश मानून सोहळ्याचं स्वरूप देत असलो, तरी अजून काही टप्पा गाठायचा आहे. आपण स्थानिकतेकडं चाललो असलो, तरी अद्याप तिथे पोहोचलेलो नाही,` असं शाहिद जमील यांनी `पीटीआय`शी बोलताना सांगितलं.

हे वाचा - कोरोनाचा भारतीयांना असाही फटका! 2 वर्षांनी घटलं आयुर्मान, IIPS अभ्यासात आलं समोर

देशात कोरोना संसर्गाच्या 3,41,59,562 केसेस झाल्या असून, 4,53,708 जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी (23 ऑक्टोबर) 16326 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून, एकूण संख्येत अल्प वाढ दिसून आली आहे. मागील 29 दिवसांपासून रोजच्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या 30,000 च्या खाली आहे. दिवाळी आता तोंडावर आली आहे. त्यामुळे अधिक काळजी घेणं, सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. कोरोनाचा आलेख खाली जाणं हा केवळ एका चित्राचा भाग आहे. ब्रिटनमध्येही (Britain) कोरोनाबाधित रुग्णसंख्या झपाट्यानं कमी होत होती; मात्र ती अचानक वाढू लागली आहे. त्यामुळे देशातल्या नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे, असं तज्ज्ञांनी सांगितलं.

First published:

Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus