नवी दिल्ली 04 जुलै : इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), एम्स (AIIMS) आणि नॅशनल क्लिनिकल रजिस्ट्रीने कोरोनाच्या पहिल्या (1st Wave of Coronavirus) आणि दुसर्या लाटेचं (2nd Wave of Coronavirus) मूल्यांकन केलं आहे. दोन्ही लाटांमध्ये काही मोठे फरक आहेत. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये (Indian Journal of Medical Research) हे सर्वेक्षण प्रसिद्ध करण्यात आले आहे. हा स्टडी 18961 रूग्णांवर केला गेला, त्यापैकी 12059 रुग्ण (Corona Patients) पहिल्या आणि 6903 रुग्ण दुसर्या लाटेतील होते.
कोरोनापेक्षा डेल्टा व्हेरियंटची लक्षणं वेगळी; या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसर्या लाटेत कोरोनाच्या विळख्यात आलेल्या लोकांचं वय कमी होतं. दुसऱ्या लाटेत तरुण लोकांवर कोरोनाचा अधिक परिणाम झाल्याचं दिसून आलं.. मात्र, पहिल्या लाटेत ७० टक्के रुग्ण हे 40 वर्षाहून अधिक वयाचे होते. दुसऱ्या लाटेत पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याची प्रकरणं पहिल्या लाटेच्या तुलनेत काही प्रमाणात कमी होती. दुसऱ्या लाटेत 63.7% पुरुष कोरोनाच्या विळख्यात आले. पहिल्या लाटेत हा आकडा 65.4% इतका होता.
पत्नीपासून दूर जाण्यासाठी नवीन लग्न झालेल्या तरुणाने घेतली 'कोरोना'ची मदत
दुसऱ्या लाटेत 49टक्के रुग्णांना श्वासासंबंधीच्या तक्रारी होत्या. तर, पहिल्या लाटेत 43 टक्के रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. दुसऱ्या लाटेत 13टक्के म्हणजेच 1422 रुग्णांना ARDS म्हणजेच अॅक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमचा सामना करावा लागला, पहिल्या लाटेत हा आकडा 8टक्के म्हणजेच 880 रुग्ण इतका होता.
20 से 39 या वयोगटातील 26.5% टक्के म्हणजेच मोठ्या संख्येत तरुणवर्ग कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत या विळख्यात आला. पहिल्या लाटेत हा आकडा 23.7% इतका होता. कोरोना रुग्णांमधील सर्वाधिक लोक हे उच्च रक्तदाबासंदर्भात तक्रारी असणारे होते. दुसऱ्या लाटेत 27.6% रुग्णांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास होता, 5% रुग्ण मधुमेहाचे होते. 4% रुग्णांना हृदयासंबंधीचे आजार होते, 1% लोकांना श्वासासंबंधीचे आजार होते तर 1% लोकांना अस्थमा होता. दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या पहिल्या लाटेच्या तुलनेत 3% जास्त होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.