Home /News /coronavirus-latest-news /

ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, AIIMS रुग्णालयात दाखल

ICMRचे प्रमुख बलराम भार्गव यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, AIIMS रुग्णालयात दाखल

इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

    नवी दिल्ली, 19 डिसेंबर : इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हृदयरोग तज्ज्ञ भार्गव यांना 8 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. मात्र तेव्हा ते क्वारंटाइन होते. अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भार्गव यांना 15 डिसेंबरला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून सुधारणा होत आहे. त्यांना लवकरच रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल असं सांगितलं आहे. डॉक्टरांची टीम सध्या त्यांच्यावर उपचार करत आहे. हे वाचा-कोरोनामुळे पतीचं झालं निधन, महिनाभरानंतर SMSवर आला निगेटिव्ह रिपोर्ट! हरियाणाचे आरोग्य मंत्र्यांवर देखील सध्या कोरोनाचे उपचार सुरू आहेत. त्यांची दुसऱ्यांदा टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनाच्या विळख्यात राजकारण्यांपासून ते सेलिब्रिटी आणि बड्या उद्योगपतींपासून ते आरोग्य तज्ज्ञांपर्यंत अनेक जण आले आहेत. दुसरीकडे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता व नाट्य निर्माते प्रशांत दामले (Prashant Damle Corona Possitive) यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांना स्वत: फेसबुकच्या माध्यमातून याची माहिती दिली. लॉकडाउननंतर पहिल्यांदाच 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग 12 डिसेंबरला पुण्यात झाला होता. त्यानंतर त्यांना कणकण जाणवत होती. त्यांनी चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या