Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाच्या काळातील विमान प्रवासात केवळ 44 रुग्ण सापडले पॉझिटिव्ह, नवा रिपोर्ट आला समोर

कोरोनाच्या काळातील विमान प्रवासात केवळ 44 रुग्ण सापडले पॉझिटिव्ह, नवा रिपोर्ट आला समोर

2020 च्या सुरुवातीपासूनच्या आकडेवारीनुसार यादरम्यान जगभरात जवळपास 12 कोटी प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. संशोधनांमधून ही माहिती समोर आल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे.

    नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर : जगभरात कोरोनाचे संकट असताना विविध सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेली विमानसेवाही सुरु झाली आहे. या प्रवासाच्या काळात सुरक्षेची काळजी घेतली जात आहे. त्यानंतर आता the International Air Transport Association म्हणजेच IATA ने नवीन माहिती दिली आहे. विमानसेवा सुरु झाल्यानंतर कोरोनाच्या केवळ 44 प्रकरणं सापडल्याचं म्हटलं आहे. 2020 च्या सुरुवातीपासूनच्या आकडेवारीनुसार यादरम्यान जगभरात जवळपास 12 कोटी प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. संशोधनांमधून ही माहिती समोर आल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे. याविषयी आधिक माहिती देताना त्यांनी सांगितले, विमान प्रवासादरम्यान संसर्ग होण्याचा धोका फार कमी आहे. आतापर्यंत केवळ 44 केस सापडल्या असून 12 कोटी प्रवाशांनी यादरम्यान विमान प्रवास केलेला आहे. याची विभागणी केली तर केवळ 27 लाख प्रवाशांच्या मागे 1 रुग्ण असं समीकरण होऊ शकते. विमानात फेसमास्क घालण्याच्या सक्ती आगोदर मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडल्याचं देखील IATA चे वैद्यकीय अधिकारी डॉ. डेव्हिड पॉवल यांनी संगितले. वाचा-धक्कादायक! अमेरिकेत माणसांकडून प्राण्यांमध्ये कोरोनाचा फैलाव? 10,000 मृत्यू यासंदर्भात विविध विमान बनवणाऱ्या कंपन्यांनी सर्व्हे केले आहेत. यामध्ये Airbus, Boeing आणि Embraer या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपनीने यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला असून प्रत्येकाचे निरीक्षण देखील वेगवेगळे आहे. IATA ने जून 2020 मध्ये मास्क वापरणे सक्तीचे केलं होतं. त्यामुळे विमान प्रवासात इतर गोष्टींच्या सुरक्षेबरोबरच मास्कचा आणि प्लॅस्टिक शिल्डचा वापर वाढला आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. वाचा-15 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय, मात्र राज्यांची तयारी नाही; हे आहे कारण या मार्गदर्शक तत्त्वांच केलं पालन 1) या विमान कंपन्यांनी आपला प्रवाशांना काही मार्गदर्शक तत्त्व घालून दिली होती. यामध्ये प्रवाशांनी विविध प्रकारच्या सुरक्षा साधनांचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. 2)प्रवाशांचा एकमेकांशी कमीतकमी संपर्क. 3)केबिनमध्ये मोठ्या प्रमाणात शुद्ध हवा खेळत राहणे. तासाभरात 20 ते 30 वेळा शुद्ध हवा बदलणे. वाचा-बाप रे! त्वचेवर तब्बल 9 तास राहू शकतात कोरोनाचे विषाणू, अशी घ्या काळजी विविध विमान बनवणाऱ्या कंपन्यांनी आपली निरीक्षणे नोंदवली आहेत. त्याचबरोबर यासाठी वापरण्यात आलेल्या पद्धतींची सविस्तर माहिती दिली आहे. प्रवाशांची सुरक्षा ही आमची प्रथम जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं प्रत्येक विमान फेरीच्या वेळी सुरक्षेची काळजी घेण्यात येत होती. नुकत्याच विमान प्रवास केलेल्या 86% प्रवाशांनी या काळात केलेल्या उपाययोजनांमुळं प्रवास सुरक्षित झाल्याचं म्हटलं आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या