मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोव्हिड पासपोर्ट म्हणजे काय आणि तो कधी लाँच होणार? कसा मिळवायचा?

कोव्हिड पासपोर्ट म्हणजे काय आणि तो कधी लाँच होणार? कसा मिळवायचा?

 प्रवाशांच्या सोयीसाठी, जगभरात 'मान्य' असलेल्या 'कोविड पासपोर्ट' विषयी सर्व फॅक्ट्स जाणून घ्या.

प्रवाशांच्या सोयीसाठी, जगभरात 'मान्य' असलेल्या 'कोविड पासपोर्ट' विषयी सर्व फॅक्ट्स जाणून घ्या.

प्रवाशांच्या सोयीसाठी, जगभरात 'मान्य' असलेल्या 'कोविड पासपोर्ट' विषयी सर्व फॅक्ट्स जाणून घ्या.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर :  आपणा सर्वांनाच माहीत आहे की कोरोना व्हायरसच्या (Coronavirus Pandemic) जगभरात झालेल्या संसर्गामुळे, बर्‍याच देशांनी  आंतरराष्ट्रीय प्रवासावर (International flights) अनेक निर्बंध लावले आहेत. भारतानेसुद्धा नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणं 31 डिसेंबरपर्यंत बंदच ठेवली आहेत. फक्त पूर्वनियोजित मोजकी विमानं इतर देशांमध्ये उडत आहेत. काही देशांनी ठराविक देशांतून येणाऱ्या प्रवाशांना मज्जाव केला आहे. जिथे निर्बंध कमी आहेत किंवा देशातील प्रवेश सुरू झाला आहे, तिथे अनेक प्रकारच्या चाचण्या (Covid test) कराव्या लागतात आणि विलगीकरणाचे (Quarantine) नियम लागू आहेत. काही देशांनी ठराविक देशांतील लोकांवर विमानाने येण्यास बंदी घातली आहे. या परिस्थितीचा विचार करता इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) यांनी 'कोविड पासपोर्ट' (COVID Passport) लाँच करण्याचा विचार केला आहे.

IATA च्या प्रस्तावानुसार हे केल्याने जगभरातील प्रवाशांच्या चाचणीसुद्धा व्यवस्थित पद्धतीने होईल, त्याचवेळी सध्याच्या क्वारंटाइन नियमांसमोर एक सोपा पर्याय उपलब्ध होईल व प्रवाशांची गैरसोय कमी होईल. प्रवाशांच्या सोयीसाठी, जगभरात 'मान्य' असलेल्या 'कोविड पासपोर्ट' विषयी सर्व फॅक्ट्स जाणून घ्या.

हे वाचा-‘या’ शहरांत मिळणार मोफत मास्क, पालिकेनं स्थापन केली Mask Bank!

कोव्हिड पासपोर्ट कसा असेल?

ग्लोबल एअरलाईन लॉबी एक खास प्रकारच्या मोबाइल फोन अॅपवर काम करत आहे, ज्याला जगभरात डिजिटल पासपोर्ट म्हटलं जाईल. या अ‍ॅपमध्ये प्रवाशाची कोव्हिड-19 चाचणी, लसीकरण प्रमाणपत्र यासारखी माहिती नोंदवली जाईल, जेणेकरून प्रवाशाला हवाई प्रवासादरम्यान अगदीच झाली तर थोडीच अडचण होईल. इतकेच नाही तर या डिजिटल पासपोर्टमध्ये प्रवाशाच्या वास्तविक पासपोर्टची ई-कॉपीसुद्धा अपलोड केली जाईल, ज्यामुळे त्याची ओळख पटेल.

कागदपत्रांच्या व्हेरिफिकेशनसाठी अॅप आयएटीएच्या टिमॅटिक सिस्टमवर (Timatic system) आधारित असेल. प्रवासी बॉर्डर कंट्रोल नियमांचे पालन करत असल्याचं ही सिस्टिम सांगते. याशिवाय प्रवाशांचे गंतव्य स्थान, ट्रान्झिट पॉइंट, राष्ट्रीयत्व, प्रवासाशी संबंधित कागदपत्रे, निवास इत्यादीविषयी पर्सनलाईज्ड माहितीही दिली जाते.

हे वाचा-कोरोना लशीसाठी पंतप्रधान मोदींची धडपड; स्वत:च करणार सुरक्षिततेची खात्री

अ‍ॅप कधी लाँच होईल?

बातमीत एक विशेष गोष्ट सांगितली गेली आहे की IATA नुसार हे मोबाइल अॅप डेटा साठवणार नाही, तर ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित असेल. 2021 च्या पहिल्या तिमाहीत हे अॅपल डिव्हाइससाठी लाँच केले जाईल. यानंतर हे अँड्रॉईडसाठी लॉन्च केले जाईल, परंतु ते कधी ते सांगण्यात आलेले नाही. दुसरीकडे, IATA ने सर्व देशांना लस उपलब्ध होताच विमान वाहतूक कर्मचारी आणि आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांसाठी लसीकरण सुनिश्चित करायला सांगितले आहे.

इतर काही अ‍ॅप्स कशी आहेत?

IATA सध्या डिजिटल पासपोर्टशी संबंधी अ‍ॅपसंदर्भात प्लॅनिंग स्टेजमध्ये आहेत, दुसरीकडे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि कॉमन्स प्रोजेक्ट फाउंडेशनसारख्या संस्थांनी लंडन ते न्यूयॉर्कमधील उड्डाणानंमध्ये 'कॉमनपास' अ‍ॅप डेव्हलप करून त्याची टेस्ट सुद्धा केली आहे. इतकेच नाही तर अबुधाबी आणि पाकिस्तानमधील उड्डाणांसाठी प्रवास सिक्युरिटी कंपनी इंटरनॅशनल SOS चा AOKpass अ‍ॅप वापरला जात आहे.

हाँगकाँग आणि सिंगापूरमध्ये ही हे दोन अॅप्स वापरण्याची योजना असल्याचे आंतरराष्ट्रीय मीडियाने सांगितले आहे.

हे वाचा-Corona लसीकरणाची तयारी करताय, पण साइड इफेक्ट्सचं काय?

ही अ‍ॅप्स का लाँच केली जात आहेत?

वार्षिक मीटींगमध्ये IATA ने ही माहिती देखील दिली की 2020 मध्ये एअरलाईन उद्योगाला 118.5 अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं आहे आणि 2021 मध्ये 38.7 अब्ज डॉलर्सचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, 2019 च्या आकडेवारीकडे बघता, आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास 90 टक्क्यांनी कमी झाला आहे. कोव्हिड-19 मुळे अर्थव्यवस्थेला लागणाऱ्या झटक्यामुळे, एव्हिएशन व्यवसायामध्ये 1.8 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत घट होईल.

याशिवाय जगभरातील एव्हिएशन उद्योगातून कोट्यवधी नोकर्‍यासुद्धा गेल्या आहेत, ज्यामुळे जगातील बर्‍याच देशांना त्यातून वर येण्यासाठी बराच काळ लागण्याची अपेक्षा आहे. हे लक्षात घेता एव्हिएशन उद्योग लवकरात लवकर पुन्हा उभारण्याचे प्रयत्न सुरू आहे.

First published:

Tags: Coronavirus