इंदूर, 05 मे: कोरोना काळात रुग्णसेवेसाठी झटणाऱ्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. अशी अनेक नावं डोळ्यासमोर येतील जी देशासाठी आप्तस्वकीयांना बाजूला सारून इतरांसाठी झटत आहे. एका आयएएस अधिकाऱ्याने कोरोना काळात
(Corona in India) असेच एक उदाहरण समोर ठेवले आहे. एसडीएम विवेक श्रोत्रीय असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते खंडवा रोडवर असलेल्या राधास्वामी सत्संग ट्रस्टचे नोडल अधिकारी आहेत. विवेक सध्या स्वतःच्या कुटुंबीयांसोबत राहत असलेल्या वेळेपेक्षाही जास्त काळ कोव्हिड सेंटरमध्ये सेवा देण्यातच घालवत आहेत. कोरोना संक्रमित
(Corona Infection) वडिलांच्या निधनानंतरही त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा कमी झालेली नाही आणि ते वडिलांच्या अंत्यसंस्कारांच्या काही वेळातच पुन्हा कामावर रुजू झाले.
विवेक यांचे वडील प्रभुदयाल श्रोत्रीय यांची ग्वाल्हेरमध्ये तब्येत बिघडल्यामुळे त्यांना 19 एप्रिलला इंदूरच्या
(Indore) वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आयसीयूमध्ये दाखल झालेल्या वडिलांची प्रकृती खालावली, ऑक्सिजनची पातळी 95 वरून 75-80 पर्यंत खाली आली. त्यांना प्लाझ्मा देण्यासाठी अरविंदो रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, त्यांना वाचवणे शक्य झाले नाही आणि सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.
हे वाचा - भाजप खासदाराचा घरचा आहेर! PMO च्या भरवशावर राहणं ‘Useless’, गडकरींकडे जबाबदारी देण्याची पंतप्रधानांकडे मागणी
विवेक यांना पूर्णवेळ वडिलांसोबत थांबणे शक्य नव्हते. परंतु, त्यांचा जावई डॉ. संदेश यांच्यासह दोन्ही रुग्णालयांच्या डॉक्टरांच्या टीमवर विश्वास ठेवून ते आपले काम करत राहिले. जेव्हा-जेव्हा त्यांना दिवसातून वेळ मिळेल तेव्हा ते कोविड रुग्णांच्या आयसीयूमध्ये दाखल असेलेल्या आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जात असत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना प्रकृती लवकरच ठीक होण्याच्या उद्देशाने प्रोत्साहन आणि धीर देत असत. तसेच, आपल्या कोव्हिड सेंटरमधील कामाविषयीही माहिती देत असत. मुलाच्या कामाविषयी जाणून घेऊन वडीलही खूश होत असत. मात्र, दुर्दैवाने त्यांचे प्राण वाचवणे शक्य झाले नाही.
महाविद्यालयीन काळातील काही मित्र, जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी इत्यादींच्या उपस्थितीत विवेक यांनी वडिलांना अंतिम निरोप दिला. सोमवारी पहाटे विजय नगर मुक्तिधाम येथे वडिलांच्या अंत्य संस्कारांनंतर विवेक कोरोना गाईडलाईन्सचे पालन करत पुन्हा कोविड सेंटरमध्ये दाखल रूग्णांच्या सेवेत हजर झाले.
हे वाचा-भयंकर! मतदानासाठी म्हणून गावी पोहोचला, कोरोनामुळे स्वत:सह आणखी 5 जणांचा मृत्यू
वडिलांना देऊ शकत होते फक्त 15 मिनिटं
राधास्वामी न्यासच्या जमिनीवर तात्पुरत्या स्वरूपाचे कोव्हिड रुग्णालय 600 बेडचे रुग्णालय उभे करण्यात आले आहे. येथे विवेक काम करत आहेत. त्यांना दिवसभराच्या कामातून केवळ 15 मिनिटे वडिलांना देणे शक्य होत असे. अशा स्थितीत त्यांच्या सोबतचे सहकारी अधिकारी तसेच, जिल्हाधिकारीही वडिलांची काळजी घेण्यासाठी अधिक वेळ देण्याचा सल्ला देत होते. मात्र, विवेक यांनी वडिलांजवळ नुसतेच बसून राहण्यापेक्षा इतर रुग्णांची शक्य ती सेवा करण्यात वेळ देणे अधिक चांगले असल्याचे उत्तर दिले होते. ते दररोज साधारण 15 मिनिटांसाठी वडिलांना भेटायला पीपीई किट घालून आयसीयूमध्ये जात असत. त्यांना सुरुवातीला पीपीई किट कसे घालायचे हेही माहिती नव्हते. त्यांच्या वडिलांची खूप काळजी घेतल्यानंतरही अखेर त्यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र, यानंतरही वडिलांच्या अंत्यसंस्कारांनंतर ते काही वेळातच कामावर पुन्हा रुजू झाले. त्यांची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.