Home /News /coronavirus-latest-news /

'मी बाबांसोबत वाढदिवस साजरा करीन', वडिलांचा कोविडने मृत्यू; मुलीने समाधी स्थळावर जाऊन कापला केक

'मी बाबांसोबत वाढदिवस साजरा करीन', वडिलांचा कोविडने मृत्यू; मुलीने समाधी स्थळावर जाऊन कापला केक

स्पंदनाचे वडील दरवर्षी तिचा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करीत. आता मात्र ती वडिलांना कधीच पाहू शकणार नाही.

    कोप्पल, 3 सप्टेंबर : तीन महिन्यांपूर्वी स्पंदनाने कोरोना (Coronavirus) महासाथीत आपल्या वडिलांना गमावलं. स्पंदनाचे वडील दरवर्षी तिचा वाढदिवस मोठा साजरा करीत होते. वडिलांच्या मृत्यूच्या तीन महिन्यांनंतर स्पंदनाचा वाढदिवस आला होता. तिला वडील हयात असताना जसा वाढदिवस (Birthday) साजरा होत होता, तसाच करायचा होता. मग तिने बाबांच्या समाधी स्थळावर जाऊन वाढदिवस साजरा केला आणि येथेच आठव्या वाढदिवसाचा केकही कापला. ही घटना कर्नाटकातील (Karnatak News) कोप्पल जिल्ह्यातील आहे. येथे स्पंदना आपल्या कुटुंबासह वडिलांच्या समाधी स्थळावर पोहोचली आणि केक कापून वाढदिवस साजरा केला. (I will celebrate birthday with Baba father dies by covid The girl went to the Samadhi site and cut the cake ) वडिलांना दिली श्रद्धांजली समाधी स्थळावर समोर उभं राहून स्पंदना कोनासागरने आपल्या वडिलांना श्रद्धांजली दिली. ती म्हणाली की, मला वाटतं की बाब अजूनही माझ्या जवळपास आहे. या विशेष दिवशी ते मला पाहत आहेत, आणि आशीर्वाद देत आहेत. माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्त्वाच्या क्षणी मी बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी येईन. हे ही वाचा-कोरोनामधून घरी बरे झालेल्या रुग्णांना किडनीचा धोका अधिक: रिसर्च राजकीय रॅलीदरम्यान कोरोनाची लागण स्पंदनाच्या आईने सांगितलं की, मे महिन्यात माझे पती महेश कोनासागर याचा मृत्यू झाला. ते एक सामाजिक कार्यकर्ते होते. एका राजकीय रॅलीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना ताप आला होता. यानंतर डॉक्टरांनी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं. 13 मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांना आमच्याच कुटुंबातील शेतात दफन करण्यात आलं. स्पंदना म्हणते बाबांची आठवण येते.. आपल्या आई-वडिलांची एकुलती एक लाडकी स्पंदना म्हणाली की, वडील नेहमी माझा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करीत. आईने जेव्हा त्यांच्या मृत्यूविषयी सांगितलं तर माझा विश्वासच बसला नाही. मला त्यांची खूप आठवण येते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona patient, Karnataka

    पुढील बातम्या