कोरोनाचं ग्रहण! 32 दिवसात हसतं-खेळतं कुटुंब संपलं; पती अन् प्राध्यापक पत्नीसह मुलाचाही मृत्यू

कोरोनाचं ग्रहण! 32 दिवसात हसतं-खेळतं कुटुंब संपलं; पती अन् प्राध्यापक पत्नीसह मुलाचाही मृत्यू

अवघ्या 32 दिवसांत महिला प्राध्यापकाचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारा कोरोनाचा (Corona Update Indore) हा भयानक चेहरा समोर आला आहे. केवळ 11 महिन्यांपूर्वी लग्न करून आलेली सून वाचली आहे.

  • Share this:

इंदूर (मध्य प्रदेश), 16 मे : अवघ्या 32 दिवसांत महिला प्राध्यापकाचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणारा कोरोनाचा (Corona Update Indore) हा भयानक चेहरा समोर आला आहे. केवळ 11 महिन्यांपूर्वी लग्न करून आलेली सून वाचली आहे. इंद्रलोक कॉलनीत राहणाऱ्या डॉ. प्रियंका जैन, पती उमेश जैन आणि खासगी विद्यापीठातील सहायक निबंधक पदावर काम करणारा त्यांचा मुलगा अमन जैन यांचे जीवन कोरोनाने हिरावून नेलं. डॉ. प्रियंका यांचे नुकतेच एका खासगी रुग्णालयात निधन झालं. तर, मागील आठवड्यात त्यांच्या मुलाचा आणि दोन आठवड्यांपूर्वी पतीचा मृत्यू झाला होता.

काही दिवसांपूर्वी कुटुंबातील दोन सदस्य एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्याच्या काही दिवसांनंतर प्रियांका यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही दिवसांनी पती आजारी पडले. दरम्यान, मुलाची तब्येतही खालावली. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झालं. यानंतर, थोड्या-थोड्या दिवसांच्या अंतरानं हे तिघेही हे जग सोडून गेले. आता कुटुंबातील फक्त त्यांची सून अवनी वाचली आहे. अवनीचे वडील अमित जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 महिन्यांपूर्वीच मुलीचे अमनशी लग्न झाले होते. दोघेही एकाच संस्थेत काम करायचे. मात्र, काही दिवसातच कुटुंबाची अशी वाताहात होईल, असा कधी विचारही केला नव्हता, असे ते म्हणाले.

शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्रियंका जैन उत्तम पायलटही होत्या

डॉ. प्रियंका जैन शहरातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञांपैकी एक होत्या. प्रियांका यांनी डबल पीएचडी केली होती. त्या उज्जैन आणि जबलपूर विद्यापीठ कार्यकारी मंडळाच्या सदस्य होत्या. तसेच, त्या चांगल्या पायलटही होत्या. आयएमएस, युनिव्हर्सिटीच्या आयआयपीएससह अनेक खासगी महाविद्यालयांमधील विद्याशाखांना त्यांनी भेट दिली होती. त्यांचे पती उमेश शहरातील प्रमुख जाहिरात संस्थेशी संबंधित होते.

लेक्चरर डॉ. इंगळे यांचे ब्लॅक फंगसमुळं निधन

शनिवारी विद्यापीठाच्या ईएमआरसीचे लेक्चरर डॉ. ललित इंगळे यांचे निधन झाले. त्यांना कोरोनानंतर काळ्या बुरशीचा संसर्ग झाला होता. खासगी रुग्णालयात त्यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रियेची तयारी केली जात होती. ऑक्सिजनची पातळी योग्य नसल्याने त्यांना भूल देण्यात अडचण येत होती.

Published by: News18 Desk
First published: May 16, 2021, 2:37 PM IST

ताज्या बातम्या