Home /News /coronavirus-latest-news /

17 दिवसांपूर्वी झालं होतं लग्न; मधुचंद्रासाठी गेलेल्या तरुणाचा कोरोनामुळे अंत

17 दिवसांपूर्वी झालं होतं लग्न; मधुचंद्रासाठी गेलेल्या तरुणाचा कोरोनामुळे अंत

29 वर्षांच्या या मृत तरुणाच्या आईनं रुग्णालय प्रशासनाविरोधात निषेध करत त्यांच्या आरोग्यसेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमेरिकेहून परत आलेल्या युवकाच्या लग्नाच्या 17 दिवसानंतरच प्रसिद्ध आयव्हीआय रुग्णालयात मृत्यू झाला.

    मोहाली, 14 मे : कोरोना महामारीच्या (Corona in India) उद्रेकादरम्यान मोहालीमधून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. स्वतःच्या लग्नासाठी अमेरिकेतून (America) आलेल्या तरुणाचा लग्नानंतर 17 दिवसांनी कोरोनामुळं अंत झाला आहे. तो मधुचंद्रासाठी गेला असताना त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगण्यात येत आहे. 29 वर्षांच्या या मृत तरुणाच्या आईनं रुग्णालय प्रशासनाविरोधात निषेध करत त्यांच्या आरोग्यसेवेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अमेरिकेहून परत आलेल्या युवकाच्या लग्नाच्या 17 दिवसानंतरच प्रसिद्ध आयव्हीआय रुग्णालयात मृत्यू झाला. चंदीगड येथील ताज हॉटेलमध्ये हा तरुण मधुचंद्रासाठी आला होता, मात्र या दरम्यान त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. आधी त्याला चंदीगडच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्याला आयव्हीआय रुग्णालयात हलवण्यात आलं, असं त्याच्या आईनं सांगितलं आहे. शिवांक वाजपेयी असे या तरुणाचं नाव आहे. हे वाचा - Good News : यंदा मे महिन्यातच बरसणार Monsoon च्या सरी, उकाड्यातून लवकरच मिळणार दिलासा अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे नोकरी करणाऱ्या कानपूरच्या तरुणाचा कोरोना संसर्गानं मृत्यू झाला. तरुणाच्या आईनं रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत, येथील डॉक्टरांनी सुरुवातीला त्याचा अहवाल नीट दिला नाही. तो कोरोना निगेटिव्ह असल्याचं सांगितलं. दुसऱ्या दिवशी मात्र त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं सांगितलं, असं त्यांनी म्हटले आहे. मृत्यूच्या आधीच्या रात्री जवळ-जवळ एक वाजेपर्यंत डॉक्टरांनी त्यांना शिवांक याची प्रकृती चांगली असल्याचं सांगितलं गेलं. मात्र, मृत्यूच्या तीन तासांपूर्वी तो गंभीर स्थितीत असल्याचे फोनवर सांगण्यात आलं . जेव्हा त्या रुग्णालयात येत होत्या, तेव्हा त्यांना त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. आपल्या मुलाला कोणतेही व्यसन नव्हते. तसेच, त्याला इतर कोणताही आजार नव्हता. त्याचा मृत्यू झालाच कसा? असं त्याच्या आईनं म्हटलं आहे. तसंच रुग्णालयात त्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे वाचा - प्रेषित मोहम्मदांनंतर आता ‘शार्ली हेब्दो’कडून हिंदू धर्माचा उपहास, कोरोना हाहाकारावरून देवतांवर टिप्पणी दरम्यान, कोरोनामुळं देशात विदारक परिस्थिती आहे. सध्या काही राज्यांमधील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृतांचा आकडा अद्यापही चिंता वाढवणारा आहे. महाराष्ट्रामध्ये दररोज 60 हजाराहून अधिक सापडणारे कोरोना रुग्णसंख्या आता 40 ते 45 हजारच्या दरम्यान आल्यानं काहीसा दिलासा मिळाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या