COVID-19: भारताच्या पहिल्या औषधाच्या मानवी चाचणीला लवकरच सुरुवात, या हॉस्पिटलमध्ये होणार प्रयोग

COVID-19: भारताच्या पहिल्या औषधाच्या मानवी चाचणीला लवकरच सुरुवात, या हॉस्पिटलमध्ये होणार प्रयोग

केंद्र सरकारने अशा प्रयोगांसाठी देशातल्या विविध राज्यांमधल्या 12 हॉस्पिटल्सची यासाठी निवड केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 6 जुलै: Covaxin या COVID-19वरच्या भारताच्या पहिल्या औषधाच्या मानवी चाचणीला लवकरच सुरुवात होणार आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच ही चांगली बातमी आहे. बेळगावच्या जीवन रेखा मल्टी स्पेशालिटी (Jeevan Rekha multi-specialty hospital) हॉस्पिटलमध्ये ही चाचणी होणार आहे. त्यासाठी 200 जणांची निवडही करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. Bharat Biotech International Ltd यांनी या औषधाची निर्मिती केली आहे.

या हॉस्पिटलचे डॉक्टर्स हा प्रयोग करणार असून  Indian Council of Medical Research (ICMR) तज्ज्ञांच्या देखरेखीखाली हा प्रयोग होणार आहे.

ICMR आणि केंद्र सरकारने या प्रयोगाला मान्यता दिली आहे. सुरुवातीला निरोगी आणि सुदृढ अशा 200 जणांना ही लस देण्यात येणार आहे. ICMRचे तज्ज्ञ यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती हॉस्पिटलचे संचालक डॉ. अमित भाटे यांनी दिली.

निरोगी लोकांना ही लस दिल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात याचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचे सगळे रिपोर्ट्स हे ICMRला पाठविले जाणार आहेत. लवकरच या प्रयोगाला सुरुवात होणार असून त्यासाठी स्वच्छेने आलेल्या 200 आरोग्य कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे. या लसीला BBV152 COVID vaccine हे नाव देण्यात आलं आहे.

 हे वाचा - भारताची ‘कोरोना लस’ केव्हा येणार? वादावर सरकारनेच खोडला ICMRचा हा दावा

केंद्र सरकारने अशा प्रयोगांसाठी देशातल्या विविध राज्यांमधल्या 12 हॉस्पिटल्सची यासाठी निवड केली असून त्यात बेळगावच्या जीवन रेखा हॉस्पिटलचा समावेश होतो.

जगभरात 140 कंपन्यांची औषधं मानवी चाचणीच्या प्रक्रियेपर्यंत पोहोचली आहेत. त्यात 11 औषधं ही भारताची आहेत. त्यात कोवॅक्सिन आणि ZyCov-D या दोन औषधांची माणसांवर प्रयोगाची घोषणाही झाली आहे. ICMRच्या घोषणेनंतर तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली होती.

 हे वाचा -  कोरोनाला हरवल्यानंतर भाजप नेत्याने केलं हे काम, वाचून तुम्हीही कराल कौतुक

अशा कामांमध्ये घाई करू नये असाही सल्ला दिला गेला होता. त्यानंतर विज्ञान मंत्रालायाने स्पष्टिकरण देत ICMRचा दावा खोडून काढला आहे. औषध वापरासाठी येण्यापूर्वी अनेक परीक्षणांमधून त्याला जावं लागतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या प्रक्रियेत काही सवलत जरी दिली गेली तरी मूलभूत नियमांना डावललं जाऊ शकत नाही, असं सरकारनं सांगितलं.

संपादन - अजय कौटिकवार

 

 

Published by: Priyanka Gawde
First published: July 6, 2020, 5:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading