मुंबई, 15 जून : एखादा माणूस गरम डोक्याचा आहे, असं आपण म्हणतो. म्हणजेच त्याचा स्वभाव चिडका किंवा रागीट आहे, असं त्यातून दर्शवायचं असतं; पण एका संशोधनातून असं समोर आलंय की, माणसाच्या शरीरापेक्षा त्याचं डोकं अर्थात मेंदू थोडा (Brain Hotter Than Body) जास्त गरमच असतो. सामान्यपणे माणसाच्या शरीराचं तापमान 37 अंश सेल्सिअस असतं; मात्र माणसाच्या मेंदूचं (Human Brain Temperature) तापमान त्यापेक्षा 2 अंश सेल्सिअसने जास्त असतं, असं संशोधनात आढळल्याचं ब्रेन जर्नलमधल्या एका लेखात म्हटलं आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचा मेंदू अधिक गरम असतो, असंही या संशोधनात म्हटलं आहे.
या संशोधनासाठी काही व्यक्तींच्या मेंदूच्या तापमानाची तपासणी करण्यात आली. त्यात या व्यक्तींच्या मेंदूचं तापमान 38.5 अंश सेल्सिअस असल्याचं दिसून आलं. IFL सायन्सच्या रिपोर्टनुसार, मेंदूचं तापमान 38.5 अंश सेल्सिअस असलं, तरी मेंदूच्या सगळ्यात घन भागाचं तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याचं आढळून आलं. मेंदू व त्याच्या आतल्या भागातलं तापमान तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपीचा (MRS) उपयोग केला. याद्वारे मेंदूला कोणताही छेद न देता तापमान मोजता येतं, 'टीव्ही 9 हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या मेंदूचं (Women Brain Are Hotter Than Men) तापमान जास्त असतं, असा एक निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे. केम्ब्रिजच्या 'मेडिकल रिसर्च कौन्सिल लॅबोरेटरी फॉर मॉलिक्युलर बायोलॉजी'ने हे संशोधन केलं आहे. डॉ. जॉन ओ’नील यांच्या म्हणण्यानुसार, मॅग्नेटिक रेझोनन्स स्पेक्ट्रोस्कोपी (MRS) करून 20 ते 40 वयोगटातल्या चाळीस व्यक्तींच्या मेंदूचं तापमान तपासलं गेलं. यात 20 स्त्रिया आणि 20 पुरुषांचा समावेश होता. यात महिलांचा मेंदू पुरुषांपेक्षा जास्त गरम असल्याचं दिसलं. त्यामागे वय, लिंग आणि मासिक पाळी ही महत्त्वाची कारणं आहेत. स्त्रियांमधल्या मासिक पाळीमुळे त्यांचा मेंदू पुरुषांपेक्षा अंदाजे अर्ध्या अंशानं अधिक गरम होतो. विशेषकरून दिवसा स्त्रियांच्या मेंदूचं तापमान 40.9 अंश सेल्सिअसच्या जवळ पोहोचतं. या संशोधनातून योग्य निष्कर्ष मिळण्यासाठी एका दिवसात तीन वेळा तापमान तपासण्यात आलं. त्यात जे बदल दिसले, त्यांचा अभ्यास करून शास्त्रज्ञांनी हे निष्कर्ष काढले आहेत.
(श्रेयस अय्यर हातावर K स्टिकर चिटकवून का खेळतोय? के अक्षरामागचं सिक्रेट उलगडलं!)
या संशोधनात एक आश्चर्यकारक निष्कर्ष निघाला असल्याचं डॉ. जॉन यांचं म्हणणं आहे. काही वेळा मेंदूचं तापमान खूप जास्त वाढतं. त्या वेळी त्याला ताप समजलं जातं; मात्र ज्यांच्या डोक्याला काही मार लागला असेल
पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांच्या मेंदूचं (Women Brain Are Hotter Than Men) तापमान जास्त असतं, असा एक निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे.
किंवा काही दुखणं झालं असेल, तर त्यांच्याच बाबतीत हे दिसून आलं आहे.
(तुमच्या गाडीची टाकी फुल आहे का? 'या' राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा!)
मानवी मेंदूचं कार्य कसं चालतं, याबाबत शास्त्रज्ञांनी आजवर खूप संशोधन केलं आहे. अजूनही हे संशोधन सुरूच आहे. मेंदूच्या तापमानाबाबत करण्यात आलेलं हे संशोधनही त्याचाच एक भाग आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.