मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाची लक्षणं आहेत मात्र चाचणी निगेटिव्ह! जाणून घ्या या परिस्थितीत कशी घ्यावी स्वतःची काळजी

कोरोनाची लक्षणं आहेत मात्र चाचणी निगेटिव्ह! जाणून घ्या या परिस्थितीत कशी घ्यावी स्वतःची काळजी

अनेकदा रुग्ण कोरोनाबाधित असले तरीही रिपोर्ट निगेटिव्ह (Corona Negative Report) येत आहेत. अशात तुम्हाला कोरोनाची लक्षणं असल्याचं जाणवत असेल तर काही गोष्टींबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

अनेकदा रुग्ण कोरोनाबाधित असले तरीही रिपोर्ट निगेटिव्ह (Corona Negative Report) येत आहेत. अशात तुम्हाला कोरोनाची लक्षणं असल्याचं जाणवत असेल तर काही गोष्टींबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

अनेकदा रुग्ण कोरोनाबाधित असले तरीही रिपोर्ट निगेटिव्ह (Corona Negative Report) येत आहेत. अशात तुम्हाला कोरोनाची लक्षणं असल्याचं जाणवत असेल तर काही गोष्टींबाबत काळजी घेण्याची गरज आहे.

  • Published by:  Kiran Pharate
नवी दिल्ली 02 मे : देशातील अनेक नागरिक सध्या कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. अशात चिंतेत भर घालणारी बाब म्हणजे कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपुढे आरटीपीसीआर टेस्टही (RTPCR Test) फेल ठरत आहे. अनेकदा रुग्ण कोरोनाबाधित असले तरीही रिपोर्ट निगेटिव्ह (Corona Negative Report) येत आहेत. अशात तुम्हाला कोरोनाची लक्षणं असल्याचं जाणवत असेल तर काही गोष्टींबाबत काळजी घेण्याची गरज आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं असतील मात्र तरीही रिपोर्ट (Test Report) निगेटिव्ह आल्यास त्याला फॉल्स निगेटिव्ह असं म्हणतात. कोरोना चाचणी करताना गळ्यातून आणि नाकातून स्वॅब घेतले जातात. अशात स्वॅब योग्य पद्धतीनं न घेतल्यास टेस्ट चुकीची येण्याची शक्यता असते. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे, की या विषाणूमध्ये झपाट्यानं बदल होत असल्यानं टेस्ट रिपोर्टमध्येही अडचणी येत आहेत. अशात कोरोनाची लक्षणं दिसल्यानंतर 2 ते 7 दिवसात टेस्ट करायला पाहिजे. यामुळे फॉल्स रिपोर्टची शक्यता कमी होते. या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष - जर तुम्हाला वास येणं किंवा चव लागणं बंद झालं असेल तर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही तुम्ही याकडे दुर्लक्ष करू नका. कारण ही दोन कोरोनाची मुख्य लक्षणं मानली जात आहेत. इतकंच नाही तर औषधं घेऊनही 2 ते 3 दिवस ताप न उतरल्यास, थकवा जाणवल्यास आणि घसा दुखल्यास या लक्षणांकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही. Explainer : सौम्य-लक्षणं नसणाऱ्या रुग्णांनी होम आयसोलेशनमध्ये कशी काळजी घ्याल? RT-PCR मध्ये रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास काय करावं ? एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं असतील मात्र रिपोर्ट निगेटिव्ह आला असेल, तरीही पाच ते सात दिवस आयसोलेट व्हायला हवं. कारण, स्वतःला कोरोना निगेटिव्ह समजून तुम्ही इतरांच्या संपर्कात आल्यास त्यांनाही लागण होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही वारंवार स्वतःची ऑक्सिजन लेवल तपासायला हवी. 95 पेक्षा अधिक ऑक्सिजन लेवल योग्य समजली जाते. लक्षणं अधिक गंभीर दिसल्यास उशीर न करता तात्काळ HRCT टेस्ट करणं गरजेचं आहे. याबाबत बोलताना भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (AIIMS) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS director Dr Randeep Guleria) म्हणाले, की कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत (second wave of coronavirus) या विषाणूचा नवा स्ट्रेन (Mutated Coronavirus strain)खूपच संसर्गजन्य आहे. निरोगी व्यक्ती एका मिनिटासाठीही संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आली, तरी त्या व्यक्तीपासून संसर्ग पसरण्याचा धोका आहे, असं डॉ. गुलेरिया यांनी सांगितलं. त्यामुळेच कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही लक्षणं दिसत असलेल्या रुग्णांवर कोविड प्रोटोकॉलनुसारच उपचार व्हायला हवेत, असं त्यांनी सुचवलं.
First published:

Tags: Corona, Corona updates, Corona virus in india

पुढील बातम्या