मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /कोरोनातून बरं झाल्यानंतर घराची स्वच्छता आवश्यक, वाचा योग्य पद्धत

कोरोनातून बरं झाल्यानंतर घराची स्वच्छता आवश्यक, वाचा योग्य पद्धत

कोरोनातून बरं झाल्यानंतर घर चांगल्या पद्धतीने सॅनिटाइज (Sanitization) आणि डिसइन्फेक्ट (Disinfection) करणं अत्यंत आवश्यक आहे. घर योग्य पद्धतीने साफ केलं गेलं नाही, तर त्यापासून पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनातून बरं झाल्यानंतर घर चांगल्या पद्धतीने सॅनिटाइज (Sanitization) आणि डिसइन्फेक्ट (Disinfection) करणं अत्यंत आवश्यक आहे. घर योग्य पद्धतीने साफ केलं गेलं नाही, तर त्यापासून पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनातून बरं झाल्यानंतर घर चांगल्या पद्धतीने सॅनिटाइज (Sanitization) आणि डिसइन्फेक्ट (Disinfection) करणं अत्यंत आवश्यक आहे. घर योग्य पद्धतीने साफ केलं गेलं नाही, तर त्यापासून पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नवी दिल्ली 04 जून : कोरोना विषाणूची दुसरी लाट (Second Wave) देशातून अद्याप ओसरलेली नाही; मात्र रुग्णसंख्या कमी व्हायला सुरुवात झाली आहे. आयसोलेशन (Isolation), हेल्दी डाएट आणि औषधोपचार यामुळे अनेकजण यातून बरे होत आहेत. कोरोनातून बरं झाल्यानंतर घर चांगल्या पद्धतीने सॅनिटाइज (Sanitization) आणि डिसइन्फेक्ट (Disinfection) करणं अत्यंत आवश्यक आहे. घर योग्य पद्धतीने साफ केलं गेलं नाही, तर त्यापासून पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोरोनातून बाहेर पडल्यावर घराची स्वच्छता कशी करायची, याबद्दलची माहिती इथे देत आहोत.

घर सॅनिटाइझ करण्यासाठी रसायनयुक्त प्रॉडक्टचा (Chemical Products) वापर करावा. त्या प्रॉडक्ट्सचा वापर करताना हातात ग्लोव्ह्ज आणि तोंडावर मास्क घालणं अत्यावश्यक आहे. ग्लोव्ह्ज घातल्यानंतर रसायनाचा थेट त्वचेला स्पर्श होत नाही. घराच्या प्रत्येक खोलीची साफसफाई करणं आवश्यक आहे. प्रत्येक खोलीचा कचरा काढून, नंतर पुसून घेणं आवश्यक आहे. पुसलेले पृष्ठभाग सुकण्यासाठी सीलिंग फॅन सुरू करावेत आणि घराच्या खिडक्या उघडून ठेवाव्या. खोल्यांमध्ये हवा खेळती राहणं आवश्यक आहे. तसंच, प्रत्येक खोलीतलं तापमान नॉर्मल असलं पाहिजे.

लादीची/फरशीची स्वच्छता चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे. त्यासाठी एका बादलीत गरम पाणी घालून त्यात साबणाचं पाणी मिसळावं. दुसऱ्या बादलीत साधं पाणी घ्यावं. तिसऱ्या बादलीत फ्लोअर डिसइन्फेक्टंट मिसळलेलं पाणी घ्यावं. सुरुवातीला लादी साबणाच्या पाण्याने पुसून घ्यावी. नंतर साध्या पाण्याने लादी पुसावी आणि मग फ्लोअर डिसइन्फेक्टंट मिसळलेल्या पाण्याने पुसून घ्यावं. पुसून झाल्यानंतर मॉप गरम पाणी आणि नॉर्मल डिसइन्फेक्टंटच्या (Normal Disinfectant) साह्याने धुवावा आणि उन्हात वाळण्यासाठी ठेवावा.

पुणेकरांसाठी गुड न्यूज! रिकव्हरी रेट ठरला देशात सर्वाधिक, लसीकरण 11 लाखांच्या वर

खोल्यांमध्ये असलेली टेबल्स-खुर्च्या, दरवाजे, खिडक्या, स्विचेस हे सर्व पृष्ठभागही सॅनिटाइझ करणं अत्यंत आवश्यक आहे. कोरोनाचा संसर्ग झालेला असताना ज्या ज्या ठिकाणी स्पर्श झाला असेल, ते ते पृष्ठभाग सॅनिटाइझ करणं आवश्यक आहे. त्यासाठी डस्टर गरम पाणी आणि डिटर्जंटच्या सहाय्यानं ओला करावा आणि शक्य असलेले सर्व पृष्ठभाग (Surfaces) चांगल्या पद्धतीने पुसून घ्यावेत. त्यानंतर सॅनिटायझरचा स्प्रे (Sanitizer Spray) फवारावा.

लॅपटॉप, टीव्ही, मोबाइल अशी गॅजेट्सदेखील स्वच्छ करणं आवश्यक आहे. त्यासाठी अल्कोहोल जास्त असलेल्या कॉमन डिसइन्फेक्टंटचा वापर करावा. लिक्विड डिसइन्फेक्टंट गॅजेटच्या अंतर्भागात जाणार नाही, याची काळजी घ्यावी. नॉर्मल डिसइन्फेक्टंट आणि डस्टरच्या सहाय्यानं कम्प्युटर, कीबोर्ड, माउस, टीव्ही, रिमोट, मोबाइल, फ्रीजचा दरवाजा आदींची स्वच्छता करावी.

खोल्यांमधले पडदे, बेडशीट्स, उश्यांचे अभ्रे, अंथरुणं, पांघरुणं स्वच्छ धुवावीत. घराचे सर्व दरवाजे, खिडक्या साबणाच्या पाण्याने धुवाव्यात. त्यानंतर सोडियम हायपोक्लोराइटच्या साह्याने डस्टर वापरून पुसाव्यात.

First published:
top videos

    Tags: Corona spread, Coronavirus