• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • हिवाळ्यात किती धोकादायक ठरू शकतो कोरोनाव्हायरस?

हिवाळ्यात किती धोकादायक ठरू शकतो कोरोनाव्हायरस?

हिवाळ्याच्या तोंडावर आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त खबरदारी बाळगावी लागणार आहे.

  • Share this:
मुंबई, 17 ऑक्टोबर : भारतात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा परिणाम कमी होताना दिसून येत आहे. त्यामुळे ठिकठिकाणी निर्बंध शिथील करण्यात येत आहेत. राज्यातील शाळा-महाविद्यालयेदेखील सुरू होत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याचा धोका आहे. यातच सध्या हिवाळा तोंडावर आला आहे. या ऋतुमध्ये सर्दी, पडसे आणि शीतज्वराचा (Influenza in winter) धोका सर्वाधिक असतो. त्यामुळे यापासून सुरक्षा बाळगणं गरजेचं असल्याचं मत वैज्ञानिकांनी व्यक्त केलं आहे (Coronavirus in winter) . देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं आहे. मात्र तेवढंच पुरेसं नसल्याचं मत इस्ट एंग्लिया विद्यापीठातील मेडिसिन विभागाचे प्राध्यापक पॉल हंटर (Paul Hunter on influenza) यांनी व्यक्त केलं आहे. लसीकरण झाल्यानंतर कोरोनाचे संक्रमण (Corona vaccination) हे अगदीच कमी धोक्याचे, किंवा मग लक्षणविरहीत असते. अँटीबॉडीज (Corona antibodies) विकसीत झाल्यानंतर लगेच कोरोनाची लागण झाल्यास, तेवढा धोका नसतो. मात्र, अँटीबॉडीज निर्माण होण्यात आणि कोरोनाची लागण होण्यात मोठे अंतर असेल, तर ते धोकादायक ठरू शकते. यंदाच्या हिवाळ्यात आपल्याला अधिक काळजी घेण्याची गरज असण्याला, खरंतर आपण आतापर्यंत घेण्यात आलेली खबरदारीच आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासूनच लॉकडाऊन, वर्क फ्रॉम होम आणि इतर खबरदारीचे उपाय आपण राबवले होते. यामुळे गेल्या दीड वर्षांमध्ये आपला फ्लूसारख्या रोगांशी सामना झालेलाच नाही. यामुळे लोकांमधील नैसर्गिक प्रतिकारशक्ती (Natural immunity decreased because of covid measures) कमी झाली आहे. यामुळेच यंदाच्या हिवाळ्यात जर सर्दी-पडशाची साथ आली, तर ती अधिक धोकादायक (Influenza more dangerous this winter) ठरू शकते. हे वाचा - धक्कादायक! कोरोना लशीऐवजी सापाचा दंश; लसीकरणावेळी तिने चक्क कोब्राच बाहेर काढला केवळ आपली प्रतिकारशक्तीच कमी झाली आहे असंही नाही, तर फ्लूचे विषाणूदेखील वेगाने विकसित होत आहेत. आपल्याकडे कोरोनावर प्रभावीपणे काम करणाऱ्या लसी आहेत. मात्र. फ्लूविरोधी तेवढ्याच प्रभावीपणे काम करतील अशा लसी (Vaccines for Flu) उपलब्ध नाहीत. त्यातच गेल्या दीड वर्षांमध्ये शीतज्वराची (Influenza vaccine) अगदीच कमी प्रकरणे समोर आल्यामुळे, त्या विषाणूचा विकास कितपत झाला आहे हे कळण्यास देखील मार्ग नाही. आतापर्यंतच्या आपल्या अनुभवातून हे नक्कीच समजले आहे, की दुसऱ्या एखाद्या आजाराची लागण झालेल्या लोकांना कोरोनाचा धोका अधिक आहे. ब्रिटनमध्ये रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या कोरोनाग्रस्तांपैकी 19 टक्के रुग्णांना शीतज्वरदेखील (Corona and influenza) असल्याचे दिसून आले होते. कोरोनासोबतच शीतज्वर झालेले रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळेच या हिवाळ्यात आपल्याला अधिकाधिक काळजी घेणे गरजेचे आहे. हे वाचा - धक्कादायक! कोरोनामुळे तब्बल 6 लाख लोकांचा मृत्यू; आता राष्ट्राध्यक्षांवर दाखल होणार खटला यावर्षी हिवाळ्यात साथीचे आजार कितपत पसरतील याचा अंदाज लावणे कठीण आहे. मात्र, शीतज्वराची लाट आली, तर ती अधिक वेगाने पसरण्याची शक्यता वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. अशातच कोरोनाचीही तिसरी लाट आल्यास, यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्याही मोठी असणार हे नक्की. त्यामुळेच हिवाळ्याच्या तोंडावर आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त खबरदारी बाळगावी लागणार आहे.
First published: