आनंदाची बातमी! 80% सुरक्षा पुरवणारे अँटी बॅक्टेरियल मास्क लवकरच येणार बाजारात

आनंदाची बातमी! 80% सुरक्षा पुरवणारे अँटी बॅक्टेरियल मास्क लवकरच येणार बाजारात

या मास्कच्या निर्मितीसाठी खूप कमी खर्च येत असून याला नष्ट करणे देखील खूप सोपे आहे. यामुळे वापरून झालेले मास्क नष्ट करण्याचे टेन्शन कमी होणार आहे.

  • Share this:

हॉंगकॉंग, 14 सप्टेंबर : कोरोनाच्या (coronavirus) या संकटकाळात सगळेच देश याविरुद्ध लढत आहेत. विविध औषधांची चाचणी देशभर सुरु असून शास्त्रज्ञांनी नवीन मास्क तयार केल्याचा दावा केला आहे. graphene मास्क असे या मास्कचे नाव असून हा मास्क अँटी बॅक्टेरियल असून सूर्यप्रकाशात 10 मिनिटे ठेवल्यास तो स्वच्छ होतो. ACS Nano या जर्नलमध्ये आलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीच्या दोन चाचण्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या दोन प्रजातींच्या नष्ट होण्यामध्ये या मास्कचा मोठा फायदा झाला आहे. या मास्कच्या निर्मितीसाठी खूप कमी खर्च येत असून याला नष्ट करणे देखील खूप सोपे आहे. यामुळे वापरून झालेले मास्क नष्ट करण्याचे टेन्शन कमी होणार असल्याचे देखील हाँगकाँग विद्यापीठातील या संशोधकाने सांगितले.

संशोधनामध्ये समोर आले आहे की, सध्या वापरात असलेले मेडिकल मास्क अँटी बॅक्टेरियल नसून हे मास्क फेकून दिल्यास अथवा ठेवल्यास याला कुणी स्पर्श केल्यास व्हायरस पसरण्याचा धोका जास्त आहे. या संशोधनाचे मुख्य अभ्यासक डॉ. ये रुक्वान ग्राफीन हे त्यांच्या अँटी बॅक्टेरिया संबंधी संशोधनासाठी आणि अभ्यासासाठी ओळखले जातात.

वाचा-वुहानच्या लॅबमधूनच झाला Coronavirus चा प्रसार, चिनी शास्त्रज्ञानं दिला पुरावा

कोरोनाचे संकट येण्याआधी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात laser-induced असणारे मास्क ग्राफिन यांनी तयार करण्याचे काम आणि संशोधन सुरु केले होते. या संशोधनासाठी या टीमने laser-induced graphene मास्क हे टेस्ट करताना त्यांना हा मास्क 82 टक्के अँटी बॅक्टेरियल आढळला. सर्व मास्कमध्ये कायम कायम वापरल्या जाणाऱ्या कार्बन फायबर आणि melt-blown fabricsचा या मास्कमध्ये खूप कमी प्रमाणात वापर करण्यात आला आहे. यामध्ये याचे प्रमाण केवळ 2 टक्के आणि 9 टक्के इतके आहे.

वाचा-कोरोनाचं रुप पुन्हा बदललं, आता डेंग्यू तापाप्रमाणे रुग्णांमध्ये दिसली लक्षणं

या संशोधनात असे दिसून आले की, या मस्कवर जमा होणारा व्हायरस हा 8 तासांनंतर मृत होतो. मात्र इतर मास्कमध्ये तो व्हायरस तसाच जिवंत राहतो. त्यामुळे अँटी बॅक्टेरिया साठी हा मास्क खूप उपयोगी असून इतर मास्कच्या तुलनेत व्हायरसचा सामना हा मास्क जास्त करत असून कोरोना व्हायरसच्या संकटात हा मास्क जास्त सुरक्षा पुरवणार आहे. मागील काही संशोधनामध्ये समोर आले होते की, कडक उन्हात कोरोनाचा विषाणू जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे या टीमने या दिशेने देखील संशोधन केले. त्यावेळी त्यांना आढळून आले कि, हे मास्क उन्हामध्ये ठेवले असता 10 मिनिटांतच ग्राफीन मटेरियलची अँटी-बॅक्टेरियाची कार्यक्षमता वाढलेली दिसूनयेते. त्यामुळे इतर सध्या मास्कचा तुलनेत हा मास्क जास्त प्रमाणात सुरक्षित ठेवण्यास सक्षम आहे.

वाचा-अमेरिकेतील तज्ज्ञाने सांगितली कोरोना लशीची खरी परिस्थिती; किमान एक वर्ष तरी...

दरम्यान, सध्या ग्राफिन यांची टीम चीनमधील लॅब्रोट्ररीबरोबर मानवी कोरोना व्हायरससह ग्राफिन मटेरिअलची चाचणी करत आहेत. त्याचबरोबर हा मास्क पुन्हा स्वच्छ करून वापरता येऊ शकतो कि नाही याचे देखील संशोधन सुरु आहे. त्याचबरोबर हे मास्क लवकरच बाजारात येण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 14, 2020, 11:48 AM IST

ताज्या बातम्या